बीड, 16 डिसेंबर: बीड (Beed) जिल्ह्याच्या माजलगाव (Majalgaon) तालुक्यातील लवुळ गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या एक महिनाभरापासून लवुळ गावात माकडांनी धुमाकूळ घातला आहे. ही माकडं गावात कुत्र्याचं पिल्लू दिसलं की, त्याला उचलून उंच झाडावर किंवा घराच्या छतावर घेऊन जात त्यांना खाली टाकून देत आहेत. या माकडांनी गेल्या महिनाभरात गावातील जवळपास 250 कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव घेतला (monkeys killed 250 puppies in a month) आहे. माकडांच्या या धक्कादायक कृत्यामुळे गावकरी दहशतीत जगत असून ही माकडं आता गावातील लहान लेकरांना देखील टार्गेट करत आहे.
माजलगावपासून दहा किमी अंतरावर लवुळ नावाचं गाव आहे. या गावची लोकसंख्या जेमतेम पाच हजारच्या आसपास आहे. या गावात मागील एक महिन्यांपासून काही माकडे कुत्र्यांची पिल्लं उचलून नेत आहेत. कुत्र्यांच्या पिल्लांना उंच झाडावर किंवा घराच्या छतावर घेऊन जात त्यांना खाली ढकलून दिलं जात आहे. या माकडांनी आतापर्यंत गावातील तब्बल 250 कुत्र्यांच्या पिल्लांना उंचावरून ढकलून दिलं असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा-विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी, साताऱ्यात दिराचा वहिनीवर बलात्कार
खरंतर, काही दिवसांपूर्वी गावातील काही कुत्र्यांनी एका माकडाच्या पिल्लावर हल्ला करून त्याचा जीव घेतला होता. तेव्हा पासून माकडं सूड भावनेनं पेटली असून बदला घेण्यासाठी त्यांनी गावातील 250 कुत्र्यांची पिल्लं मारली असल्याची चर्चा गावात आहे. या प्रकाराकडे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील दुर्लक्ष केलं आहे. वन विभागाशी संपर्क साधला असता, कर्मचाऱ्यांनी गावात येऊन संबंधित वानरास पकडण्याचा प्रयत्न केला. पण माकड हाती न लागल्याने कर्माचारी गावातून निघून गेले, ते परत गावात फिरकले देखील नाहीत.
हेही वाचा-VIDEO: '...नाहीतर फासावर लटकवेल' जिल्हाधिकाऱ्यांची आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकी
सध्या गावातील कुत्र्यांच्या पिल्लांची संख्या देखील कमी झाली आहे. त्यामुळे ही माकडं आता लहान लेकरांना टार्गेट करत आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलांवर अचानक हल्ला करून त्यांना जखमी केलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गावातील संतराम शिंदे यांच्या आठ वर्षाच्या नातवाला माकडांनी उचलून पत्र्यावर नेलं होतं. यावेळी गावकऱ्यांनी दगड आणि काठ्या उगरल्याने माकडांनी बालकाला सोडून पळ काढला आहे. माकडांच्या या कृत्यामुळे गावातील नागरिक दहशतीखाली जगत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Crime news