Home /News /pune /

Pune: मित्र पत्नीवर करायचे बलात्कार अन् पतीला व्हायचा आनंद; 3 वर्षे सुरू होता भयावह प्रकार

Pune: मित्र पत्नीवर करायचे बलात्कार अन् पतीला व्हायचा आनंद; 3 वर्षे सुरू होता भयावह प्रकार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Crime in Pune: पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) याठिकाणी नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या काही मित्रांकडून स्वत:च्या पत्नीवर बलात्कार करवला (husband forced friend to rape on own wife) आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 16 डिसेंबर: पुणे (Pune) जिल्ह्यातील बारामती (Baramati) याठिकाणी नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या काही मित्रांकडून स्वत:च्या पत्नीवर बलात्कार करवला (husband forced friend to rape on own wife) आहे. गेल्या तीन वर्षांपासून आरोपी पत्नी वेगवेगळ्या मित्रांकडून आपल्या पत्नीवर बलात्कार करायला लावत होता. आरोपी पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं अखेर बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीसह पाच जणांना ताब्यात (5 arrested) घेतलं आहे. आणखी काही आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? बारामतीजवळील एका गावातील रहिवासी असणाऱ्या तरुणाचं 2016 साली एका तरुणीशी लग्न झालं होतं. पण लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये लैंगिक समस्या निर्माण झाल्या होत्या. पती समलैंगिक असल्याने तो आपल्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवू शकत नव्हता. सुरुवातीचे काही दिवस पत्नीने याकडे दुर्लक्ष केलं. पण कालांतराने त्यांच्यातील लैंगिक समस्या वाढत गेली. हेही वाचा-डोळ्यात मिरची पूड टाकत लोखंडी रॉडने घातले घाव; अनैतिक संबंधातून BF चा खेळ खल्लास यातून आरोपी पतीने एकेदिवशी आपल्या पत्नीच्या वॉट्सअॅप क्रमांकावरून आपल्या मित्रांना मेसेज केला आणि त्यांना भेटायला घरी बोलावलं. मित्र घरी आल्यानंतर विकृत पतीने मित्राला पत्नीवर बलात्कार करण्यास सांगितलं. मित्र पत्नीवर बलात्कार करत असताना, मानसिकदृष्या विकृत पती खूश होतं होता. 2017 ते 2021 दरम्यान विकृत पतीने अशाच प्रकारे आपल्या वेगवेगळ्या मित्रांकडून पत्नीवर बलात्कार करवला आहे. पत्नीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी पती दररोज एका वेगळ्या मित्राला आमंत्रित करायचा. हेही वाचा-'माझ्या पतीने घरी काम करणाऱ्या मुलीवर अत्याचार केला, काही करा हो' पत्नीने या प्रकाराला विरोध केल्याने, दोघांमध्ये वादही झाला. सहा महिने दोघांत वाद झाल्यानंतर नवऱ्यानं माफी मागितली. पण पुन्हा नवऱ्याने तोच प्रकार सुरू ठेवला. पतीच्या या विकृत कृत्याला संतापलेल्या पत्नीने अखेर माहेरी जाऊन संबंधित प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला आहे. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात जाऊ पीडितेवर सात ते आठ जणांनी बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत पतीसह पाच जणांना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune, Pune crime, Rape

    पुढील बातम्या