मराठी बातम्या /बातम्या /विदेश /ट्रान्सजेंडर मॉडेलने हिजाब घातला म्हणून मोठा वाद; शेवटी कायमचा सोडला देश

ट्रान्सजेंडर मॉडेलने हिजाब घातला म्हणून मोठा वाद; शेवटी कायमचा सोडला देश

या प्रकरणात नूरवर खटला चालवण्यात आला आणि ती दोषी आढळली तर तिला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

या प्रकरणात नूरवर खटला चालवण्यात आला आणि ती दोषी आढळली तर तिला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

या प्रकरणात नूरवर खटला चालवण्यात आला आणि ती दोषी आढळली तर तिला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

    नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : एकीकडे जगभरात ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांबदल बोललं जातं. त्यांच्या अधिकारांसाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. दुसरीकडे मात्र अजूनही काही ठिकाणी त्यांना कोणत्या तरी कारणावरून त्रास दिला जातो, अगदी बहिष्कृतही केलं जातं. अनेकदा अशा घटना दाबल्याही जातात. काही जण धाडसानं पुढं येऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडतात. मलेशियातही सध्या एका ट्रान्सजेंडर (Malaysian Transgender) व्यक्तीची चर्चा सुरू आहे. या ट्रान्सजेंडर मॉडेलवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करून तिला प्रचंड त्रास देण्यात आला. शेवटी तिला आपला देश सोडून पळून जावं लागलं.

    नूर सजत कमरुज्जमान (Nur Sajat Kamaruzzaman) असं या मलेशियन ट्रान्सजेंडर (Malaysian Transgender) मॉडेलचं नाव आहे. ती 36 वर्षांची आहे. एका धार्मिक सोहळ्यात तिनं हिजाब घातला होता. त्यामुळे तिच्यावर इस्लाम धर्माचा अपमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तिला अटकही करण्यात आली. शेवटी त्रास इतका वाढला, की नूरला आपला देश सोडावा लागला. नूर सजत 36 वर्षांची आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. ती एक मॉडेलही आहे. नूर सजत (Nur Sajat Kamaruzzaman ऑस्ट्रेलियातून मलेशियात स्थायिक झाली होती. काही दिवसांपूर्वी तिने एका धार्मिक कार्यक्रमात हिजाब घातला आणि वादाला सुरुवात झाली. त्यामुळे तिला पुन्हा ऑस्ट्रेलियात परत जावं लागलं.

    2018 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका खासगी धार्मिक सोहळ्यात नूर सजतनं मुस्लिम महिलांसारखा हिजाब घातला होता. त्याचे फोटोही तिनं पोस्ट केले होते. त्यानंतर वाद सुरू झाला. नूर एक पुरुष आहे आणि इस्लाममध्ये पुरुष महिलांचे कपडे घालू शकत नाही, असा आक्षेप घेतला गेला. प्रत्यक्षात नूर एक ट्रान्सजेंडर आहे. तिला शरणार्थीचा दर्जा दिला होता.

    हे ही वाचा-सर्वात महाग कविता! विरहाच्या ओळींना 3 कोटींची बोली, 1000 शब्दांत मांडली व्यथा

    मलेशियाच्या सेलंगोर राज्यातल्या JAIS नं नूरवर इस्लामचा अपमान केल्याचे आरोप केले होते. JAIS च्या अधिकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केल्यानंतर तिथून पळून जाण्याशिवाय पर्यायच नव्हता, असं नूरनं BBC शी बोलताना सांगितलं.

    “कदाचित मी ट्रान्सजेंडर असल्यानं असल्यानं मला ते एका ट्रान्स महिलेच्या रूपात पाहतात. त्यामुळे मला पकडलं, मारहाण झाली तरी त्यांना काहीही देणंघेणं नाही; पण ट्रान्स महिलांनाही काही भावना असतात. आम्हालाही सर्वसामान्य लोकांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे,” असं नूरचं म्हणणं आहे.

    “माझे आई-वडील आणि माझ्या कुटुंबासमोर मला मारहाण करण्यात आली, धक्काबुक्की करण्यात आली, बेड्या घालण्यात आल्या. माझी मानहानी करण्यात आली. मला तिथून पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मला खूप वाईट वाटत होतं. मी त्यांना पूर्ण सहकार्य करत होते. तरीही माझ्याबरोबर त्यांनी इतकं वाईट वर्तन केलं,” असं नूरनं सांगितलं.

    दुसरीकडे “जर ती मलेशियात परत यायला तयार असेल आणि स्वत:ची चूक कबूल करायला तयार असेल तर आम्हाला काहीच अडचण नाही. तिला शिक्षा करायची आमचीही इच्छा नाही. आम्हाला फक्त तिला एक धडा द्यायचा आहे,” असं मलेशियाचे धार्मिक व्यवहार मंत्री इद्रिस यांनी म्हटलं आहे. “नूरनं अशा अनेक गोष्टी केल्या आहेत ज्यामुळे धार्मिक भावना भडकू शकतात,” अशी प्रतिक्रिया आणखी एका मुस्लिम नेत्यानं दिली आहे.

    मलेशियाच्या अधिकाऱ्यांनी नूरच्या त्वरित प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. नूरवर खटला चालवण्यात आला आणि ती दोषी आढळली तर तिला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

    First published: