गडचिरोली, 29 जून: दंडकारण्यासह देशातल्या 70 जिल्ह्यात माओवादी संघटनेच्या माध्यमातून हिंसक कारवाया केल्या जात आहेत. छत्तीसगढ पोलिसांनी मोस्ट वॉंटेड माओवाद्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत माओवादी नेता मिलींद तेलतुंबडेसह माओवाद्याच्या संघटनेचा महासचिव नंबाला केशव, माजी महासचिव मुप्पाला लक्ष्मणराव उर्फ गणपती तसेच दंडकारण्याची विशेष जबाबदारी असलेला भुपतीचा समावेश आहे. या सगळ्यांवर सुमारे 12 कोटी रुपयांचं बक्षीस आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा हिंसाचारानंतर आता या प्रकरणातही मिलिंद तेलतुंबडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या 18 सदस्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा..जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, चकमकीत तीन दहशतवाद्यांचा केला खात्मा
नंबाला केशववर आणि गणपतीवर पाच राज्याच प्रत्येकी तीन कोटीपेक्षा जास्त बक्षीस आहे. माओवाद्याच्या केंद्रीय समितीच्या 14 सदस्यांची नावे या यादीत आहेत. मिलिंद तेलतुंबडेवर तीन राज्यात एक कोटीपेक्षा जास्तीचे बक्षीस आहे. या माओवाद्यांवर महाराष्ट्रात प्रत्येकी 50 लाखांपेक्षा जास्त बक्षीस आहे. या माओवाद्यांच्या अटकेसाठी सुरक्षा यंत्रणा आता नवी रणनीती तयार करत आहे.
गडचिरोली नक्षली हल्ल्यात मिलिंद तेलतुंबडेचा हात!
दरम्यान, महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे 2019 रोजी गडचिरोलीतील कुरखेड्याजवळ जांभूरखेडा गावाजवळ पोलिसांवर झालेल्या भ्याड माओवादी हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा...आज बोहल्यावर चढणारच, प्रशासनाने परिसर केला सील; नवरदेवाची वरात पुन्हा घरात!
1 मे रोजी गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी भूसुरुंगस्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये 15 जवान शहीद झाले होते. त्यानंतर शनिवारी ( 4 मे ) माओवाद्यांविरोधात पुराडा पोलिस ठाण्यात हत्या आणि देशद्रोहासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या 18 सदस्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.