श्रीनगर, 29 जून : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी सकाळी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून एक रायफल आणि दोन पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. हे दहशतवादी कोणत्या गटातले होते याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. तर अजूनही अनंतनागच्या खुलचोहर भागात सुरक्षा दलाने घेराव घातला असून कारवाई सुरुच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या सूचनेनंतर सुरक्षा दलाने खुलचोहर परिसरात कारवाई केली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला त्यानंतर सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू असून संपूर्ण परिसरात सुरक्षा दलाकडून तपास सुरू आहे. परिसरात आणखी दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती समोर येत आहे.
कोरोनाची 3 नवी लक्षणं आली समोर, त्रास जाणवला तर तात्काळ करा COVID-19 टेस्ट
दरम्यान, गेल्या काही दिवसांआधीही जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir)त्राल सेक्टरमध्ये भारतीय सुरक्षा दलांशी (Indian security force) झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा (Terrorist) खात्मा करण्यात आला होता. दहशतवाद्यांशी सुरू असलेली चकमक संपली असून भारतीय सुरक्षा दलाने आजूबाजूचा परिसर घेरला आणि शोध मोहीम सुरू केली. खरंतर या वर्षी अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गेल्या 19 दिवसांत 35 दहशतवादी ठार झाले आहेत.
त्रास सेक्टरमध्ये काही दहशतवादी लपून बसले असल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. हे दहशवतवादी मोठा घात करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी टीम तयार करून परिसरात छापा मारला. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
मुंबई-पुणे हायवेवर भरधाव ट्रेलरची स्विफ्ट आणि टेम्पोला धडक, दोन जण जागीच ठार
19 दिवसांत ठार झाले 35 दहशतवादी
जम्मू-काश्मीरमध्ये यावर्षी अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. गेल्या 19 दिवसांत 35 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, तर यावर्षी सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये 110 दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमध्ये 125 अधिक दहशतवाद्यांना ठार मारण्याचा कट तयार केल्याचं वृत्त आहे.
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jammu and kashimir, Jammu and kashmir terrorist attack