Home /News /maharashtra /

मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी, ठाकरेंचा जगनमोहन रेड्डींना फोन

मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी, ठाकरेंचा जगनमोहन रेड्डींना फोन

सर्वात श्रीमंत अशा तिरुमला तिरुपती देवस्थानासाठी (Tirumala Tirupati Devasthan Trust) नव्या ट्रस्ट बोर्डाची बुधवारी स्थापना केली.

    मुंबई, 16 सप्टेंबर: आंध्र प्रदेश सरकारनं (Andhra Pradesh)देशातील प्रसिद्ध आणि सर्वात श्रीमंत अशा तिरुमला तिरुपती देवस्थानासाठी (Tirumala Tirupati Devasthan Trust) नव्या ट्रस्ट बोर्डाची बुधवारी स्थापना केली. या ट्रस्टमध्ये महाराष्ट्रातील एका व्यक्तीची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind narvekar) यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. या यादीत देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते. देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित असे आंध्र प्रदेशातील तिरूमला येथील तिरुपती देवस्थानाची ख्याती आहे. काल आंध्र प्रदेश सरकारने अधिकृत अधिसूचना काढत, नवी तिरूमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यांच्या नियुक्तीसाठी देशभरातून मोठी चढाओढ असते. मात्र प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधून ही नियुक्ती सूचवत असतात. याचप्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray)यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ( Y S Jaganmohan Reddy) यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केली. त्यानंतर आंध्र सरकारकडून 24 सदस्यांच्या यादीत मिलिंद नार्वेकरांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. हेही वाचा- नाशिककर डेंग्यू, चिकनगुणियाच्या साथीनं हैराण; खासगी रुग्णालय फुल्ल मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर याआधीच मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग (MPL) गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची धुरा आहेच. त्यानंतर आता देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. सेक्स करताना केलं डिस्टर्ब; भूकेनं व्याकूळ आजीला निर्दयीपणे संपवलं, साताऱ्यातील घटना कोण आहेत मिलिंद नार्वेकर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अशी मिलिंद नार्वेकर यांची ओळख आहे. गटप्रमुख त्यानंतर उद्धव ठाकरेंचे सचिव आणि आता शिवसेना सचिव असा राजकीय प्रवास नार्वेकरांचा आहे. गेल्या वर्षी मिलिंद नार्वेकर यांची मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या