नाशिकमध्ये डेंग्यू, चिकनगुणियाच्या रुग्णांचा उच्चांक, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 700 पार

नाशिकमध्ये डेंग्यू, चिकनगुणियाच्या रुग्णांचा उच्चांक, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 700 पार

आता डेंग्यू (Dengue)आणि चिकनगुणियाचे (Chikungunya) वाढते रुग्ण डोकेदुखी ठरू लागली आहे.

  • Share this:

नाशिक, 16 सप्टेंबर: राज्यात (Maharashtra State) कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) तिसऱ्या लाटेचा (Third Wave) संभाव्य धोका असताना आता डेंग्यू (Dengue)आणि चिकनगुणियाचे (Chikungunya) वाढते रुग्ण डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यात चिकनगुनिया आणि डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या 10 दिवसात 140 जणांना डेंग्यूची बाधा झाली आहे. तर चिकनगुणियाचे तब्बल 45 रुग्ण आढळून आलेत.

नाशिकचे खासगी रुग्णालय सध्या भरले आहेत. त्यातच नाशिकच्या महिला भाजप आमदारालाही डेंग्यूची बाधा झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे लहान मुलांच्या आजाराचंही प्रमाणही दुपटीनं वाढलं आहे. जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 700 च्या वर तर चिकनगुणियाचे 95 रुग्ण सापडलेत. शहरात या दोन्ही डासांमुळे निर्माण होणाऱ्या आजाराची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा- टेरर मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड कोण?, समोर आली धक्कादायक माहिती

यंदाची ही आकडेवारी पाच वर्षांतील विक्रम तोडणारी आकडेवारी आहे. 1 जानेवारी ते 14 सप्टेंबर या कालावधीत 717 डेंग्यूचे तर 537 चिकूनगुनियाचे रुग्ण आढळले. ऑगस्ट महिन्यात 1362 संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यात आले होते. त्यात 311 जणांना डेंग्यू झाल्याचं आढळून आलं होतं. तर चिकनगुणियाचे 730 नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 210 जणांना या आजाराची लागण झाली. आता सप्टेंबर महिन्याच्या पंधरवाड्यातच संख्या प्रचंड वाढली आहे.

डेंग्यूचा ताप कमी करण्यासाठी उपयुक्त औषधी वनस्पती

पपईची पानं

myupchar चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं की, पपईची पानं डेंग्यू तापाच्या नैसर्गिक उपचारांसाठी वापरली जाऊ शकतात. त्याची पानं चिरडून रस काढा आणि नंतर कापडाच्या सहाय्याने गाळून घ्या. हा शुद्ध रस प्या. पोषक आणि सेंद्रिय संयुगं यांचं मिश्रण प्लेटलेट्सची संख्या वाढवतं. यातील जीवनसत्त्व सी रोगप्रतिकारक शक्ती सुधारतं आणि रक्तातील विषारी द्रव बाहेर टाकण्यास मदत करतं.

कडूनिंबाची पानं

डेंग्यूच्या तापामध्ये कडूनिंबाच्या पानांचा अर्क पिणं फायदेशीर ठरतं. यामुळे रक्त प्लेटलेट्स तसंच पांढर्‍या रक्त पेशींमध्ये वाढ होते. कडूनिंबाच्या पानांचा रस रोगप्रतिकारक शक्ती सुधारू शकतो.

हेही वाचा- CPL 2021 Final: ड्वेन ब्राव्होच्या टीमने विजेतेपदाचा दुष्काळ संपवला; अखेरच्या बॉलवर सेंट किट्सचा रोमांचक विजय 

मेथीची पानं

मेथीची पानं ताप तसंच वेदना कमी करण्यात फायदेशीर ठरू शकतात. डेंग्यू तापाची लक्षणं कमी करण्यासाठी मेथीची पानं हा लोकप्रिय उपाय आहे. एवढंच नाही यामुळे चांगली झोप येण्यासही मदत होते.

तुळशीची पानं

आयुर्वेदिक औषधात डेंग्यू तापाच्या उपचारांसाठी बराच काळ तुळशीची पानं घेण्याची शिफारस केली जाते. तुळशीची पानं आणि काळी मिरी पाण्यात उकळवा आणि प्या. यामुळे रोग प्रतिकारशक्ती देखील वाढेल.

बार्ली/जव गवत

बार्लीपासून बनवलेला चहा प्या किंवा बार्ली गवत थेट खा. त्याच्या सेवनानं प्लेटलेट्सची संख्या वेगानं वाढेल.

Published by: Pooja Vichare
First published: September 16, 2021, 9:56 AM IST
Tags: nashik

ताज्या बातम्या