ही खुर्ची आहे सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या सावळजची. तिथे बाळू लोखंडे यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे आणि खुर्चीही तिथलीच आहे. हीच बाळू लोखंड्यांची खुर्ची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. मॅंचेस्टर या UK मधल्या शहरात हायस्ट्रीटवरच्या एका रेस्टॉरंट बाहेर चक्क मराठीत नाव आणि गाव लिहिलेली लोखंडी खुर्ची सुनंदन लेले यांना दिसली आणि त्यांच्या त्या VIDEO ने धमाल उडविली आहे. सुनंदन लेले हे क्रिकेट पत्रकार आहेत. लंडन दौऱ्यावर असताना त्यांनी मँचेस्टर येथे फिरताना तेथे दिसलेल्या बाळू लोखंडेच्या खुर्चीबद्दल पोस्ट केली आहे. या वीस सेकंदाच्या व्हिडीओ मध्ये जुन्या काळातील फोल्डिंगची लोखंडी खुर्ची दिसते आहे आणि त्यावर बाळू लोखंडे असे मराठीत लिहिलेलं दिसत आहे. पुढे सावळज असं गावाचं नावही लिहिलेलं आहे. हार्दिक पंड्या कुठे झाला गायब? Mumbai Indians च्या बॉलिंग कोचने दिलं उत्तर आपल्याकडे या अशा जुन्या पद्धतीच्या लोखंडी खुर्चीवर बसणं फार प्रतिष्ठेचं मानलं जाणार नाही. पण साहेबाच्या देशात मात्र ही खुर्ची अँटिक पीस म्हणून मिरवते आहे. आणि चकाचक हॉटेलची शान वाढवताना दिसते आहे. खुर्ची इंग्लंडमध्ये पोहोचली कशी? बाळू लोखंडे ही व्यक्ती सावळज येथे आजही माया मंडप डेकोरेटर्स या नावाने मंडप डेकोरेटरचा व्यवसाय करत आहेत. हे व्यावसायिक आपल्या वस्तूंवर नावं टाकत असतात. बाळू लोखंडे यांनीही टाकलं होतं. आपल्याकडील लोखंडी खुर्च्या 13 किलो वजनी होत्या. त्या जड असल्यानं त्यांनी पंधरा वर्षापूर्वी भंगार मध्ये विकून टाकून प्लॅस्टिकच्या खुर्च्या घेतल्या. मात्र त्यापैकी दोन खुर्च्या चक्क मँचेस्टरपर्यत कशा पोहोचल्या हे गूढच आहे. कदाचित भंगाराच्या दुकानातून कुणी त्या जुन्या बाजारात विकल्या असतील आणि तिथून थेट अँटिक वस्तूंच्या संग्रहात त्या पोहोचल्या असतील. पण त्या बाळू लोखंड्यांच्याच आहेत हे नक्की. बाळू लोखंडे यांचा सुनंदन लेले यांच्याशीही संपर्क झाला आहे. 'लेलेंनाही मी त्या आमच्या खुर्च्या असल्याचं सांगितलं.' आजही त्यांच्याकडे काही तशा खुर्च्या आहेत. 'आमच्या सावळजची द्राक्षे कधीच सातासमुद्रापार पोहीचली आहेत पण इथल्या खुर्चीच्या प्रेमात लंडनचा साहेब कसा पडला हे कोणास ठाउक..', असं बाळू अभिमानाने सांगतात.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: England, IND Vs ENG, Sangli