• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • हार्दिक पंड्या कुठे झाला गायब? Mumbai Indians च्या बॉलिंग कोचने दिलं उत्तर

हार्दिक पंड्या कुठे झाला गायब? Mumbai Indians च्या बॉलिंग कोचने दिलं उत्तर

ऑलराउंडर असलेला पंड्या मुंबई इंडियन्सच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे तो कधी खेळताना दिसेल, असा प्रश्न त्या मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत बाँड यांना विचारण्यात आला होता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स टीमला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आयपीएल पुन्हा सुरू झाल्यापासून ही मुंबईची (Kolkata beat Mumbai) दुसरी मॅच आणि दुसरा सलग पराभव होता. या दोन्ही मॅचेसमध्ये मुंबईच्या फॅन्सना हार्दिक पंड्याची (Hardik Pandya missing) उणीव चांगलीच जाणवली. पंड्या कुठे आहे आणि पुढच्या मॅचमध्ये तरी तो खेळेल का, हा प्रश्न फॅन्सना (MI Fans) पडला आहे. याबाबत मुंबई इंडियन्सचे बॉलिंग कोच (Mumbai Indians Bowling coach) शेन बाँड (Shane Bond) यांनी माहिती दिली. ऑलराउंडर असलेला पंड्या मुंबई इंडियन्सच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे तो कधी खेळताना दिसेल, असा प्रश्न त्या मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत बाँड यांना विचारण्यात आला होता. त्यावर, “हार्दिकला मैदानात उतरवण्यासाठी (Waiting to put Pandya back on field) आम्हीही केव्हापासून वाट पाहत आहोत. रोहितप्रमाणेच त्याचंही ट्रेनिंग (Hardik Pandya training well) अगदी चांगलं चाललं आहे आणि लवकरच तो मुंबईकडून मैदानात (Hardik might play soon) खेळताना दिसेल,” असं बाँड यांनी सांगितलं. “हार्दिकचं फिट असणं मुंबईसाठी आणि टीम इंडियासाठीही गरजेचं आहे. आयपीएलनंतर त्याला टी-20 वर्ल्डकपमध्येही (Hardik Pandya in World cup squad) खेळायचं आहे. ही गोष्ट लक्षात घेऊनच त्याच्यावर कमीत कमी ताण कसा येईल हे आम्ही पाहतो आहोत. केवळ हार्दिकच नाही, तर भारतीय क्रिकेट संघातल्या सर्वच खेळाडूंबाबत मुंबई इंडियन्सची (MI) हीच भूमिका आहे,” असं बाँड पुढे म्हणाले. हिंदुस्तान टाइम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मुंबईचा प्रमुख कोच माहेला जयवर्धने याने यापूर्वी हार्दिकला पहिल्या सामन्यातून वगळण्याचं कारण स्पष्ट केलं होतं. हार्दिकला काही त्रास जाणवत असल्यामुळे, खबरदारी म्हणून त्याला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या मॅचमध्ये आराम दिला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यावेळीही हार्दिकला बाहेरच बसवण्यात आलं होतं. बॉलिंग कोच बाँड यांनीही या निर्णयाला दुजोरा दिला होता. हे ही वाचा-IPL 2021: सलग 2 पराभवामुळे रोहितचं टेन्शन वाढलं, मुंबईचं स्वप्न धोक्यात “एखाद्या खेळाडूवर उगाच दबाव आणणं योग्य नाही. तुम्हाला खेळाडूंची स्थिती आणि इतर गोष्टींचाही विचार करावा लागतो. एखाद्या सामन्यात खेळण्यासाठी जबरदस्ती करून, त्यात तो खेळाडू जखमी झाला तर पूर्ण टुर्नामेंटला तो मुकू शकतो. त्यामुळेच आता त्याला आराम देऊन बाकी सामन्यांमध्ये संधी देणंच योग्य आहे. कारण त्यामुळे आमची जिंकण्याची शक्यता नक्कीच वाढते,” असं सांगून बाँड यांनी हार्दिकला बाहेर बसवण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं. उर्वरित सामन्यांमध्ये चांगल्या खेळाचं प्रदर्शन करून, मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आणि टुर्नामेंट जिंकण्यासाठीही हार्दिक मदत करू शकतो, असा विश्वास बाँड यांनी या वेळी व्यक्त केला.
  First published: