मुंबई, 28 नोव्हेंबर : यूएईमध्ये सुरू असलेल्या टी10 लीगमध्ये (T10 League) बॉलर्सची झोप उडालेली आहे. या स्पर्धेत प्रत्येक मॅच अविश्वसनीय खेळ होत आहे. शनिवारी टीम अबू धाबी (Team Abu Dhabi) आणि नॉर्दन वॉरियर्स (Northern Worriors) या मॅचमध्येही भरपूर रन निघाले. अबू धाबीनं पहिल्यांदा बॅटींग करताना फक्त 10 ओव्हरमध्ये 6 आऊट 145 रन केले. 10 ओव्हर्सच्या मॅचमध्ये इतके रन क्वचित होतात. पण, नॉर्दन वॉरियर्सनी हे मोठे आव्हान 5 बॉल राखत पार केले. केनर लुईस (Kennar Lewis) आणि मोईन अली (Moeen Ali) या वॉरियर्सच्या ओपनिंग जोडीनं आऊट न होता हे आव्हान पूर्ण केले. लुईसनं 32 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 4 फोरच्या मदतीनं नाबाद 65 रन काढले. तर मोईन अलीनं त्याच्याहीपेक्षा आक्रमक खेळ केला. मोईननं 23 बॉलमध्ये 3 फोर आणि तब्बल 9 सिक्स लगावत नाबाद 77 रन काढले.
9️⃣ Sixes
— T10 Global (@T10League) November 28, 2021
3️⃣ Fours
7️⃣7️⃣ from 2️⃣3️⃣ balls
A classy innings from Moeen Ali 👏#AbuDhabiT10 #InAbuDhabi #CricketsFastestFormat pic.twitter.com/Q2bW7KPtjS
CSK देणार बक्षीस मोईन अली आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स टीमकडून खेळतो. या सिझनमध्ये (IPL 2021) चेन्नईच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा होता. आता पुढील आयपीएल सिझनपूर्वी खेळाडूंचे मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. या ऑक्शनपूर्वी खेळाडूंना रिटेन करण्यासाठी 30 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. IND vs NZ: टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरतोय ‘हा’ खेळाडू, कानपूरमध्येही आणले अडचणीत चेन्नईच्या टीमची चौथा खेळाडू म्हणून मोईन अलीसोबत (Moeen Ali) चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयपीएलचा पुढचा मोसम भारतातच खेळवला जाणार असल्याचं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं, त्यामुळे ऑफ स्पिनर आणि ऑलराऊंडर असलेल्या मोईन अलीला टीममध्ये ठेवण्यासाठी सीएसके इच्छुक आहे.टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून मोईन सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. यापूर्वी टी20 वर्ल्ड कपमध्येही त्यानं इंग्लंडकडून दमदार खेळ केला होता. आता या चांगल्या कामगिरीसाठी त्याला चेन्नई रिटेन करुन बक्षीस देणार का हे येत्या दोन दिवसांमध्ये स्पष्ट होईल.