मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 5 जागीच ठार, 6 जण गंभीर

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 5 जागीच ठार, 6 जण गंभीर

पुणे सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur highway)  भीमानगर मार्गावर (Bhimanagar road)  भीषण अपघात (terrible accident)  झाला आहे.

पुणे सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur highway) भीमानगर मार्गावर (Bhimanagar road) भीषण अपघात (terrible accident) झाला आहे.

पुणे सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur highway) भीमानगर मार्गावर (Bhimanagar road) भीषण अपघात (terrible accident) झाला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

सोलापूर, 28 नोव्हेंबर: पुणे सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur highway) भीमानगर मार्गावर (Bhimanagar road) भीषण अपघात (terrible accident) झाला आहे. ग्यानी ढाब्यासमोर ट्रक आणि टँकर यांची (truck and tanker collided) समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनं ही भीषण दुर्घटना घडली. या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत. तर 6 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हा अपघात शनिवारी रात्री 11.30 ते 11.45 वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातातील जखमींना टेंभुर्णी आणि इंदापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा- IPL 2022: धोनीच्या सहकाऱ्यानं 9 सिक्स लगावत केली बॉलरची थट्टा, CSK लवकरच देणार बक्षीस

मळीने भरलेला टँकर (एमएच 14 सीपी 4020) तांदूळ असलेला ट्रक (एमएच 25/4045) भीमानगर येथील सरदारजी ढाब्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक बसल्यानं हा अपघात झाला. या दोन्ही वाहनांची धडक झाल्यानंतर ट्रक महामार्गावर आडवा पडला. त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

टेंभुर्णी, इंदापूर, महामार्ग सुरक्षा पथकातील अधिकारी आणि पोलिसांना केलेल्या दिड तासाच्या प्रयत्नानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली.

हेही वाचा- ''शेवटचं दर्शनही घेता आलं नाही'',धनंजय मुंडेंच्या आयुष्यातला सलत राहणारा प्रसंग

या अपघातातील दोन्ही वाहनांची धडक एवढी जोरदार होती की, अपघातातील दोन्ही वाहनांच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी आले. तसंच पोलिसांनी क्रेनच्या साह्याने महामार्गावरील आडवा पडलेला ट्रक बाजूला करून बंद पडलेली वाहतूक पूर्ववत सुरु केली.

First published:

Tags: Accident, Pune solapur