मुंबई, 25 डिसेंबर: नवी मुंबईतील वाशी (Vashi, Navi Mumbai) रेल्वेच्या पुलावर एक तरुणीला रेल्वेतून खाली फेकून देण्याची धक्कादायक घटना समोर आली. पीडितेवर लैंगिक अत्याचार करून तिला जबर मारहाण केल्याबाबत रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेवरून शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) चांगल्याच संतापल्या.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या घटनेची तत्काळ दखल घेतली आहे. यासंदर्भात डॉ.गोऱ्हे यांनी रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. पीडितेला मनोधैर्य योजनेअंतर्गत तात्काळ मदत आणि आरोपीला तात्काळ पकडण्यासाठी रेल्वे पोलीस विभागास निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा...कोरोनाचा कहर! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या तरुण पुतण्याचा मृत्यू
पीडित तरुणीवर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असून बेशुद्ध अवस्थेत असल्याने अद्यापपर्यंत जबाब घेण्यात आला नाही. तसेच वैद्यकीय अहवाल आल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील, असं रेल्वे पोलीस आयुक्तांनी डॉ.गोऱ्हे यांना सांगितले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या पोलीस आयुक्त सेनगावकर व रेल्वे पोलिसांनी यांनी तत्परतेने केलेली कार्यवाही समाधानकारक आहे. त्याचप्रमाणे या घटने संदर्भात आरोपीला पकडण्याचे निर्देश दिले तसेच पीडित तरुणीला मदत मिळण्याबाबत काही सूचना पोलीस आयुक्त सेनगावकर यांना दिल्या आहेत.
पीडितेला मदत मिळण्याबाबत मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत प्रस्ताव पोलिसांनी तात्काळ विधी व न्याय प्राधिकरण यांच्याकडे पाठविण्यात यावा, आरोपींला शोधण्यासाठी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी यंत्रणेला आदेश देण्यात यावेत, पीडित तरुणीचे आणि कुटुंबाचे समुपदेशन होण्यासाठी उचित कार्यवाही करण्यात यावी.
हेही वाचा.. भाजप नगरसेवकाने अधिकाऱ्याला चोपले, खड्ड्यात ढकलून देण्याचा केला प्रयत्न, VIDEO
सदरील पीडितेच्या लढ्यात शिवसेना महिला आघाडी आणि स्त्री आधार केंद्रच्या कार्यकर्त्या त्यांना न्यायालयीन मदत, सामाजिक स्तरावरील मदतीसाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. उपसभापती कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी डॉ.अर्चना पाटील यांनी देखील घटनेचा तपशील जाणून हॉस्पिटल येथील डॉक्टरांशी संवाद साधून डॉ. गोऱ्हे यांच्यावतीने पीडितेच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.