Home /News /crime /

चार दिवसांनंतर नवरी म्हणाली; 'विवाह समारंभात पोळ्या लाटायला आले होते, जबरदस्तीने लावलं लग्न'

चार दिवसांनंतर नवरी म्हणाली; 'विवाह समारंभात पोळ्या लाटायला आले होते, जबरदस्तीने लावलं लग्न'

लाखो रुपये खर्च करुन लग्नाचा घाट घालण्यात आला होता, त्यानंतर नवरदेवाला मात्र मोठा धक्का बसला

    जोधपूर, 25 डिसेंबर : राजस्थानधील जोधपूरमध्ये एक फसवणुकीच्या चित्रपटासाठी घटना समोर आली आहे. लग्नाच्या नावावर एका नवरदेवासोबत फसवणुकीची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे जेव्हा लग्नाच्या चार दिवसांनंतर वधू आपल्या माहेरी गेली तेव्हा पतीने दिलेल्या मोबाइल फोनवरुन त्यांना सांगितलं की, तुमच्यासोबत धोका झाला आहे. मी तर लग्नात पोळ्या करण्याच काम करीत होती, मला जबरदस्तीने तुमच्यासोबत पाठवण्यात आलं. हे ऐकून नवरदेव उम्मेद सिंह यांला जबरदस्त धक्का बसला. या संपूर्ण घटनेत नवरदेवाने 10 लाखांचं कर्ज घेऊन लग्न केलं होतं. मात्र गंगा सिंह याने सासऱ्यारी मदत करण्याच्या बहाण्याने 3.50 लाख रुपये घेतले आणि बाकीचे पैसे लग्नाच्या अन्य विधींसाठी लावला. आता उम्मेद सिंह यांनी पोलिसात न्यायाची मागणी केली आहे. ज्यामध्ये मतोडा पोलीस ठाण्यात गंगा सिंह यांच्याविरोधात आयपीसी कलम 420. 406 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. उम्मेद सिंह यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, तब्बल 20 दिवसांपूर्वी माझ्या घरी लग्नाचं स्थळ घेऊन गंगा सिंह आणि नागौरचे काही लोक आले होते. तेव्हा गंगा सिंह म्हणाले की, माझ्या नात्यात एक मुलगी आहे. तुमचं लग्न लावून देतो. हे ऐकून उम्मेद सिंह आपला मामा आणि भावासह मुलीला पाहण्यासाठी गेला. तेथे वधू पिंकू कवरसोबत लग्न निश्चित करण्यात आलं. त्यानंतर उम्मेद सिंहच्या नातेवाईकांना गंगा सिंहने सांगितलं की, मुलीच्या वडिलांची आर्थिक स्थिती चांगली नाही. लग्नाचा खर्च तुम्हालाच करावा लागेल आणि मुलीच्या वडिलांना 3.50 लाख रुपये द्यावे लागतील. 7 डिसेंबर रोजी उम्मेद सिंह आपल्या नातेवाईकांसोबत पुन्हा मुलीच्या घरी गेला, जेथे गंगा सिंह यांना 2 लाख रुपये देण्यातआले. तेव्हा गंगा सिंह म्हणाले की, 11 डिसेंबर रोजी तुम्ही वऱ्हाड घेऊन या. गंगा सिंहने दोन्ही कुटुंबीयांना सांगितलं की,  गंगा सिंह यांनी सांगितलं की, लग्नाबाबत त्यांनी कोणालाही सांगू नये. अन्यथा लग्न होऊ शकणार नाही. उम्मेद सिंह लग्न होत असल्याने आनंदात होता. त्याने कोणालाच याची माहिती होऊ दिली नाही. 11 डिसेंबरच्या सायंकाळी उम्मेद सिंह वरात घेऊन नागौर पोहोचला तर गंगा सिंह म्हणाला की, काही वेळ थांबा. मुलीच्या कुटुंबात कोणाचा तरी मृत्यू झाला आहे. तेव्हा गंगा सिंहने स्वत:च्या गावी मांगलोद येथे वरात आणण्यास सांगितलं. तेथे गंगा सिंहने 1 लाख 50 हजार रुपये घेतले आणि मग लग्न करण्यास परवानगी दिली. नवरा वधुला घेऊन गावी आला तेव्हा गावकऱ्यांना कळालं की उम्मेदचं लग्न झालं आहे. मात्र नवरदेवाचा आरोप आहे की, जेव्हा पहिल्यांदा मुलगी पाहण्यासाठी गेलो तेव्हा दुसऱ्या मुलीला दाखविण्यात आलं, मात्र लग्न दुसऱ्याच मुलीसोबत लावण्यात आलं. त्यानंतरच नवरदेव शांत होता. लग्नाच्या 2 दिवसांनंतर वधू कांताला सासरी घेण्यासाठी गंगा सिंह आला, त्यानंतर पुन्हा 2 दिवसांनंतर कांताला सासरी सोडण्यात आलं. तेव्हा वराने एक मोबाइल फोन तिला गिफ्ट केलं. त्याच मोबाइलवरुन 19 डिसेंबर रोजी कांताने नवरदेव उम्मेद सिंहला फोन करुन सांगितलं की, मी कांत आहे..गंगा सिंहने तुमची फसवणूक केली आहे. तिला मला घाबरवून लग्न केलं आणि मला भीलवाडा येथे सोडलं. मी नागौर येथे 7 दिवसांसाठी लग्नात पोळ्या लाटायला आले होते. 1 रुपये प्रतिदिवस मजुरीनुसार गंगा सिंह याने मला लग्नात पोळ्या लाटायला आणलं होतं. मात्र त्यानंतरही तो मला घाबरवत होता आणि मी सांगतो तर वाग अशी धमकी देत होता. भिती पोटी कांता या लग्नासाठी तयार झाली. आता या प्रकरणात पीडित उम्मेद सिंह याने गंगा सिंग विरोधात जोधपूर जिल्ह्यातील मतोडा पोलीस ठाण्यात आयपीसीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Marriage

    पुढील बातम्या