जाहिरात
मराठी बातम्या / देश / Coronavirus : वडिलांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी डॉक्टरांनी तिला दिली होती मोजून 3 मिनिटं

Coronavirus : वडिलांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी डॉक्टरांनी तिला दिली होती मोजून 3 मिनिटं

गेल्या 3 महिन्यात रुग्णसंख्येत 5 पटीने वाढ झाली आहे. शिवाय मृत्यूदरदेखील 3 पटीने वाढला असून 680000 पर्यंत पोहोचला आहे.

गेल्या 3 महिन्यात रुग्णसंख्येत 5 पटीने वाढ झाली आहे. शिवाय मृत्यूदरदेखील 3 पटीने वाढला असून 680000 पर्यंत पोहोचला आहे.

मुलीला वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी केवळ 3 मिनिटांचा अवधी देण्यात आला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

इम्फाळ, 05 जून : देशात कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 2.82 टक्के आहे. कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मुलीला अंत्यदर्शनासाठी केवळ 3 मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. यावेळी डॉक्टरांची नजर घडाळ्यावर होती. तिसरा मिनिट पूर्ण होताच मुलीला घेऊन जाण्यात आलं. ही धक्कादायक घटना मणिपूर इथे घडली आहे. नॉर्थईस्ट टुडे वेबसाइटनुसार 22 वर्षीय अंजली हिमांगटे या तरुणीचे वडिलांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचीही माहिती मिळाली आहे. वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी अंजलीला 3 मिनिटांचा वेळ देण्यात आला. यावेळी पीपीई किट घालून वडिलांचं अंत्यदर्शन घेण्याची परवानगी मिळाली. अंजली पीपीई सूट घालून वडिलांचं अंत्यदर्शन घेतलं. बाबा मला माफ करा. माझ्यावर निराश होऊ नका यापुढे मी शेवटच्या प्रवासात आपल्यासोबत राहू शकत नाही. आयुष्यात तुम्ही मला आनंद मिळावा म्हणून खूप केलंत असं म्हणत अंजलीला अश्रू अनावर झाले. मात्र तिथल्या डॉक्टरांचं लक्ष घड्याळावर होतं. त्यांनी 3 मिनिटं पूर्ण होताच तिला सावरत बाहेर आणलं. मेडिकल स्टाफ अंजलीच्या वडिलांचं पार्थिव घेऊन गेला आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण परिसर कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी सॅनिटाइझ करण्यात आला. सध्या अंजलीला होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. संपादन-  क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात