मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बीडमध्ये 'या' लोकनेत्याच्या कारखान्याबाहेर शेतकरी आक्रमक, गाळप बंदची दिली हाक

बीडमध्ये 'या' लोकनेत्याच्या कारखान्याबाहेर शेतकरी आक्रमक, गाळप बंदची दिली हाक

विविध मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी घेतला आंदोलनाचा पवित्रा

विविध मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी घेतला आंदोलनाचा पवित्रा

विविध मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी घेतला आंदोलनाचा पवित्रा

बीड, 21 डिसेंबर: एफआरपीप्रमाणे (FRP) ऊसाला (Sugarcane) भाव द्या, या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी (Sugarcane Farmer) आक्रमक झाले आहेत. गाळप बंद करण्याची आंदोलक शेतकऱ्यांनी हाक दिली आहे. बीड जिल्ह्यातील तेलगाव (Telgaon, Beed) येथील लोकनेते सुंदरराव सोळंके (Loknete Sundarlal Solanke) सहकारी साखर कारखान्याबाहेर सोमवारी शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. साखर कारखान्यांनी गाळपासाठी नेलेल्या ऊसाला पहिला हप्ता 2500 रुपये प्रतिटन भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हेही वाचा...शेतातील उभ्या पिकासह शेतमालकावर केली करणी! पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यानं पहिला हप्ता 1600 रुपयांनी काढून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. याच्या निषेधार्थ शेतकरी एकत्र आले आहेत. त्यांनी आक्रमकपणे गाळप बंदची हाक दिली आहे. साखर कारखान्याच्या गेटसमोर ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांनी धरणे आंदोलन केलं. या आंदोलनात ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झालं होते. माजलगाव मतदारसंघात लोकनेते सुंदरराव सोळंके कारखाना, छत्रपती साखर कारखाना, जय महेश शुगर असे तीन कारखाने आहेत. यामध्ये यावर्षी गाळपासाठी नेलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्यानं 1609 रुपये प्रति टन पहिला हप्ता दिला आहे. तर छत्रपती कारखाना 1900 रुपये व जय महेशनं 2000 रुपये पहिला हप्ता दिला आहे. तरी लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याने कमी हप्ता काढलेला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तिव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. हेही वाचा...देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांशी आमचे कितीही मतभेद असले तरी... शेतकऱ्यांच्या ऊसाचा पहिला हप्ता 2500 रूपये प्रति टन द्यावा, एफआरपीप्रमाणे ऊस दर आठ दिवसांत जाहीर करावा, शेतकऱ्यांना ऊसाचं बिल 15 दिवसांत द्यावं, साखर उत्पन्नाशिवाय कारखान्यानं जे काही विविध प्रकल्प सुरू केले आहेत, त्याची माहिती संकेत स्थळावर प्रसिद्ध करावी, सभासद शेतकऱ्यांचा ऊस प्राधान्यानं नेण्यात यावा, या मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
First published:

Tags: Beed, Maharashtra

पुढील बातम्या