• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या कारखान्यात मोठी चोरी, 38 लाखांचं साहित्य लंपास

पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या कारखान्यात मोठी चोरी, 38 लाखांचं साहित्य लंपास

धक्कादायक बाब म्हणजे 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्‍टोबर या कालावधीत झालेल्या चोरीबाबत तब्बल दोन महिन्यांनंतर कारखाना प्रशासनाला जाग आल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

  • Share this:
बीड, 23 डिसेंबर : परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यात (Vaidyanath Co-operative Sugar factory, Parli) मोठी चोरी (Robbery) झाल्याची बाब उघड झाली आहे. जवळपास 37 लाखांचं साहित्य चोरीला गेलं आहे. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) या कारखान्याच्या चेअरमन आहे. या घडलेल्या प्रकारामुळे आता वैद्यनाथ साखर कारखान्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गोडाऊनमधील संगणक व इतर साहित्य चोरीला गेल्याची तक्रार कारखान्यातील लिपिक खदिर शेख यांनी दिली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. हेही वाचा...एल्गार परिषदेवरून पुण्यात वाद पेटला! ब्राह्मण महासंघानं केली 'ही' मागणी मिळालेली माहिती अशी की, मागच्या वर्षी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद होता. त्यात यंदा कोरोनो संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर झालं. त्यामुळे कारखाना बंदच होता. याच दरम्यान साखर कारखान्यामध्ये चोरी झाल्याचा संशंय व्यक्त केला जात आहे. कारखान्याचे स्टोअर कीपर जी.टी. मुंडे यांच्याकडून कारखान्याचे लिपिक खदिर शेख यांना चोरीची माहिती समजली. लिपिक आणि लीगल इन्चार्ज यांनी चोरीच्या ठिकाणाची पाहणी केली असता स्टोअर आणि वर्कशॉपच्या मागील बाजूचे शटर उचकटल्यात आल्याचं निदर्शनास आलं. धक्कादायक बाब म्हणजे 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्‍टोबर या कालावधीत झालेल्या चोरीबाबत तब्बल दोन महिन्यांनंतर कारखाना प्रशासनाला जाग आल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हेही वाचा...कुकूचकु! एका कुटुंबाने थाटात साजरा केला कोंबड्याचा वाढदिवस स्टोअर गोदाम वर्कशॉप मधून संगणक, मॉनिटर, 200 किलो कॉपर मटेरियल, 400 किलो मिलबोरिंग, ब्रास इंपेरियर, बुश राउंड बार असे एकूण 37 लाख 84 हजार 914 रुपयाचे साहित्य चोरीला गेल्याची तक्रार कारखान्यातील लिपिक खदिर शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Published by:Sandip Parolekar
First published: