Home /News /viral /

कुकूचकु! एका कुटुंबाने थाटात साजरा केला कोंबड्याचा वाढदिवस

कुकूचकु! एका कुटुंबाने थाटात साजरा केला कोंबड्याचा वाढदिवस

एका कुटुंबाने वीरू आणि शेरू या कोंबड्यांच्या जोडीचा वाढदिवस साजरा केला. या कुटुंबात तीन मुलांसह हे दोन कोंबडे आणि अन्य पाच असे एकूण दहा सदस्य आहेत. वीरू आणि शेरू गेली पाच वर्षे या कुटुंबाचा भाग असून यंदा त्यांचा पाचवा वाढदिवस या कुटुंबांनं अगदी धूमधडाक्यात साजरा केला.

पुढे वाचा ...
  बेंगळुरू, 23 डिसेंबर : अनेकदा माणसाची जीवाभावाची सोबती ठरतात ती मुकी जनावरं. घरातील पाळीव प्राणी तर असा लळा लावतात की घरातील एक अविभाज्य घटक होऊन जातात. त्यांचं निर्वाज्य, निरपेक्ष प्रेम सगळ्यांच्या मनातील प्रेमभावना जागृत करतं. घरात लहान मुलं असतील, तर त्यांची आणि त्या पाळीव प्राण्याची तर अगदी घट्ट दोस्ती असते. घरातील सदस्यांप्रमाणे पाळीव प्राण्याचे लाड केले जातात. त्यांचेही वाढदिवस थाटामाटात साजरे केले जातात. आतापर्यंत कुत्रा किंवा मांजर यांच्या वाढदिवसाच्या गोष्टी ऐकल्या होत्या. अगदी अलीकडेच एका कुटुंबांनं आपल्या कुत्रीचे डोहाळजेवण केल्याचीही बातमी होती, पण कर्नाटकातील एका कुटुंबानं चक्क आपल्या कोंबडयांच्या (Roosters) जोडीचा वाढदिवस साजरा करून नवीनच पायंडा पाडला आहे. कर्नाटकमधील (karantaka) बेळगाव (Belgavi) इथं राहणाऱ्या कुटुंबानं अगदी मुलांचा वाढदिवस (Birthday) जसा सजावट करून, मित्र परिवाराला बोलावून, केक आणून थाटात साजरा करतात, तसाच वाढदिवस या कोंबड्यांच्या जोडीचा (Rooster’s Pair) केला. या वाढदिवसाच्या समारंभाचा व्हिडीओही बनवला असून, तो सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला आहे.

  (वाचा - कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर, दुबईतील भारतीय तरुणाला लागली करोडोंची लॉटरी)

  या कुटुंबानं वीरू आणि शेरू (Veeru and Sheru) या कोंबड्यांच्या जोडीचा वाढदिवस साजरा केला. या कुटुंबात तीन मुलांसह हे दोन कोंबडे आणि अन्य पाच असे एकूण दहा सदस्य आहेत. वीरू आणि शेरू गेली पाच वर्षे या कुटुंबाचा भाग असून यंदा त्यांचा पाचवा वाढदिवस या कुटुंबांनं अगदी धूमधडाक्यात साजरा केला. या जोडीसाठी आकर्षक रंगसंगती असलेला आणि डोनाल्ड डकचेही चित्र असलेला खास केक बनवून घेण्यात आला होता. त्यांचे फोटो असलेले बॅनर भिंतीवर लावून त्याभोवती रंगीत फुगे लावून सजावट करण्यात आली होती. रोषणाई करण्यात आली होती. आसपासच्या बालगोपाळांनाही बोलावण्यात आलं होतं.

  (वाचा - VIDEO प्रभुदेवाच्या गाण्यावर नाचताना चिमुरडीने फोडला TV,पाहा नेमकं काय झालं)

  हॅपी बर्थ डे टू यू म्हणत त्या गाण्याच्या तालावर मुलांनी वीरू आणि शेरूला हातात धरून त्यांच्या पायांनी केक कटिंगही केलं. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद बघण्याजोगा होता. आपल्या मुक्या मित्रांचा वाढदिवस आपल्यासारखाच साजरा होतोय याचा त्यांना झालेला आनंद काही औरच होता. सध्याच्या तणावाच्या वातावरणात घरातील सदस्यांप्रमाणे या मुक्या प्राण्यांचा थाटात वाढदिवस साजऱ्या करणाऱ्या या कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत असून, सोशल मीडियावरही त्यांच्या या कृतीला भरभरून दाद मिळत आहे.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या