मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा, उभी पीकं डोळ्यादेखत जाताहेत जळून!

मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा, उभी पीकं डोळ्यादेखत जाताहेत जळून!

पाऊस येईल या भाबड्या आशेवर शेतकरी होता. आता मात्र त्याचा धीर संपत चालला असून पाऊस आला नाही तर त्याच्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट पडणार आहे.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड 21 ऑगस्ट : मुंबईसह, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे. महापूराने सर्व उद्धवस्त केलंय. नदी, नाले तलाव तुडुंब भरून ओसंडून वाहताहेत. मात्र मराठवाडयातले अनेक जिल्हे अजून कोरडेच आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने उभी पिकं डोळ्यादेखत जळून जात आहेत. जनावरांच्या आणि माणसांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. भर पावसाळ्यात जिल्ह्यांत टँकर आणि चारा छावण्या सुरु आहे. बीड जिल्ह्यातील लहान-मोठे (मध्यम-लघु )144 प्रकल्प अजून मृत साठ्यात आहेत. पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही पाणी पहायला मिळत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. खरीप पिकांचे पंचनामे करुन तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

बीड तालुक्यांतील आनंदवाडी आणि वासनवाडी शिवारातील पांडुरंग यांची  आठ एकर शेती होती. त्यांनी शेतात कापूस, मका आणि बाजारी लावली. एकरी 10 हजार खर्च आला पण आत्ता शेतात जावून पाहिले तर सर्वकाही जळून गेल्याचं दु:ख त्यांनी व्यक्त केलं. मका करपून गेला तर कापसाची वाढ खुंटली आहे. ऐन दुष्काळात लाख रुपये शेतात घालून देखील पदरात काहीच पडत नाही म्हणून हा शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलाय.

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पुन्हा केलं 'हे' भावनिक आवाहन!

खायला टाकायला काही नाही म्हणून 70 हजार रुपयाची जनावरे 35 हजारांना विकल्याचं पांडुरंग गोरे यांनी सांगितलं. मुलांची शिक्षणं आणि घर कसं चालवायचं असा त्यांच्यापढे आता प्रश्न आहे.

अनेक शेतकऱ्यांची कपाशी, सोयाबीन तूर मूग, उडीद ही पिके करपून गेल्याने कुटुंब जागवायचं कसं हा शेतकऱ्यांपुढचा खुप मोठा प्रश्न आहे. इथे राहून काय करावं डोळ्यादेखत पिकं जळत्यात ते पाहवत नाही अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.

मागच्या चार वर्षात सततच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय. शेतीत पेरणीसाठी खर्च केला पण हातात काहीच पडलं नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नच गंभीर आहे. कोरडी आश्वसनं नको तर ठोस उपाय योजना करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

कॉलेज कॅण्टीनमध्ये नो पिझ्झा, नो बर्गर; फास्ट फूडवर बंदी!

बीड शहराला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प कोरडा ठाक आहे. यामुळे दुष्काळ डोकावतो कीं काय यांची चिंता आहे. पावसाचे काळे कुट्ट ढग हुलकावणी देत आहे. जून महिन्यातच्या शेवटी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरणीची कामे उरकून घेतली. पाऊस येईल या भाबड्या आशेवर शेतकरी होता आता मात्र त्याचा धीर संपत चालला असून पाऊस आला नाही तर त्याच्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट पडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 05:29 PM IST

ताज्या बातम्या