Home /News /maharashtra /

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा.. असं म्हणत पठ्ठा थेट चढला टॉवरवर, पाहा VIDEO

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा.. असं म्हणत पठ्ठा थेट चढला टॉवरवर, पाहा VIDEO

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी चिघळताना दिसत आहे.

    सचिन जिरे, (प्रतिनिधी) औरंगाबाद, 22 डिसेंबर: राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा आणखी चिघळताना दिसत आहे. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयीन (Supreme Corurt) स्थगिती त्वरित उठवून लवकरात लवकर आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, या मागणीसाठी छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भागवत भूमरे (Bhagwat Bhumare) यांनी पाचोड येथील बीएसएनएल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं आहे. हेही वाचा...बाळासाहेब सानप यांच्या घरवापसीनंतर भाजपमध्ये उभी फूट, शेकडो कार्यकर्ते नाराज छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भागवत भुमरे यांनी मंगळवारी सकाळी हातात एक बॅनर घेतला. तो पाचोड येथील बीएसएनएल टॉवर खाली लावून 'एक मराठा लाख मराठा' अशी घोषणाबाजी केली. नंतर टॉवरवर चढून भागवत भूमरे यांनी आंदोलन सुरू केलं आहे. काही वेळातच ही वार्ता गावात पसरल्यानं बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. दरम्यान पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून भागवत भूमरे यांनी खाली उतरावे यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, भूमरे हे अद्याप खाली उतरलेले नसल्याचं समजते. हेही वाचा...सुरेश रैनावर गुन्हा दाखल, पोलिसांनी टाकला होता पबवर छापा दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली स्थगिती उठवावी आणि मराठा आरक्षणासंदर्भात तातडीनं निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. तरुणाकडून शोले स्टाईल आंदोलन करण्यात येत आहे. मराठा आरक्षण प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावरी स्थगिती उठवावी तसेच हा मराठा समाजातील विद्यार्थी आणि नोकरी इच्छूक उमेदवारांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भागवत भूमरे यांनी केली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Aurangabad, Maratha kranti morcha, Maratha reservation

    पुढील बातम्या