जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ‘आता जगायचं कसं? ‘कोरोना’मुळे आमच्या स्वप्नांची पार माती झाली’

‘आता जगायचं कसं? ‘कोरोना’मुळे आमच्या स्वप्नांची पार माती झाली’

‘आता जगायचं कसं? ‘कोरोना’मुळे आमच्या स्वप्नांची पार माती झाली’

फळ उत्पादक शेतकरीसुद्धा चिंतेत असून द्राक्ष, डाळींब, आंबा या फळांची निर्यात पूर्ण थांबली आहे. कोट्यवधींचा माल तसाच पडून आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड 31 मार्च :  फुललेलं शिवार पाहून आनंदीत होणार फूल उत्पादक शेतकरी ‘कोरोना’मुळे पार कोलमडून गेलाय. कोरोना व्हायरसचा सगळ्यात जास्त फटका बसला तो शेतकरीवर्गाला अगोदर हातातोंडाशी आलेला घास गारपीट आणि अवकाळी पावसाने हिरावून घेतला त्यानंतर उरले-सुरल्या पिकांमधून आर्थिक गरज भागवली जाईल अशी स्वप्न शेतकऱ्यांनी रंगवलेली होती मात्र कोरोनाव्हायरसमुळे या स्वप्नंची अक्षरशः माती झाली, त्यामुळेच फुल उत्पादक शेतकरी कोमेजून गेला आहे. बीड तालुक्यातील आंबील वडगाव गावातील राजभाऊ कदम या शेतकऱ्याने दोन एकर वरती झेंडू फुलाची लागवड केली होती गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती आणि लग्नसोहळे हे मार्च महिना आणि त्यानंतर येत असल्याने या समारंभांसाठी मोठ्या प्रमाणात फुलांची मागणी असते. हे लक्षात घेता या शेतकऱ्याने लागवड केली होती मात्र ऐन हंगामाच्या काळातच लॉक डाऊनमुळे मार्केट बंद आहे. त्यातच शेतकऱ्यांचा पिकावर झालेला खर्च देखील निघणार नाही या चिंतेत हा शेतकरी आहे फुलाने फुलून गेलेला 21 एकर परिसराकडे पाहून हा शेतकरी मात्र चिंतातुर झालाय, या फुलांना मार्केटही नाही जनावरे खात नाही. उलट शेत नीट करायचे असेल तर दहा हजार रुपयांचा खर्च करावा लागेल तेही पदरमोड करून यामुळे खूप मोठं संकट कोसळल्याचे राजभाऊ कदम यांनी सांगितले. 10-15 वर्षांआधीच माणसांमध्ये पसरला Coronavirus, आता घेतोय जीव; धक्कादायक संशोधन त्यांच्यासारखीच स्थिती सगळ्याच फूल उत्पदक शेतकऱ्यांची आहे. त्याचबरोबर फळ उत्पादक शेतकरीसुद्धा चिंतेत असून द्राक्ष, डाळींब, आंबा या फळांची निर्यात पूर्ण थांबली आहे. कोट्यवधींचा माल तसाच पडून आहे आता जगायचं कसं याची चिंता या शेतकऱ्यांना पडली आहे. दिल्लीतल्या मरकज प्रकरणामुळे सगळ्यांची झोप उडाली. सरकारसह सर्वच संस्था ‘सोशल डिस्‍टेंसिंग’चं आवाहन करत असतानाच दिल्लीतलं प्रकरण पुढे आलं आहे. तब्लीग-ए-जमात कार्यक्रमात तब्बल 2 हजार लोक सहभागी झाले होते. त्यात विदेशातून आलेल्या मैलवींचाही समावेश होता. त्यामुळे त्यातल्या 300 पेक्षा जास्त जणांना कोरोना झाल्याचा संशय आहे.

मक्का-मदिनेतल्या मशिदी बंद होऊ शकतात तर भारतातल्या का नाही? – जावेद अख्तर

अशी परिस्थिती असताना दारुल उलूम देवबंदने मिशिदी बंद ठेवण्यासाठी फतवा काढावा अशी मागणी अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहिर महमूद (Tahir Mahmood) यांनी केली आहे. त्यावर आता ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर  (Javed Akhtar) यांनीही आपलं मत व्यक्त केलं. जावेद अख्तर म्हणाले, ताहिर महमूद हे विद्वान आहेत. त्यांच्या मागणीला माझं पूर्ण समर्थन आहे. काबा, मक्का आणि मदिनेतल्या मशिदी जर बंद राहू शकतात तर भारतातल्या का नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.

नागपूरमध्ये कडकडीत लॉकडाउन अन् चोरांनी फोडले बिअरबार, पाहा हा VIDEO

देशभरात सध्या दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेमुळे भीतीचे वातावरण आहे. 13 ते 15 मार्च दरम्यान फक्त देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं हजर होते. भारत आणि परदेशातील लोकांसह एकूण 1830 लोक या परिषदेसाठी उपस्थित होते. 15 मार्चनंतर तब्बल 1400 लोकं दिल्लीमध्ये होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात