जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / 10 ते 15 वर्षांआधीच माणसांमध्ये पसरला Coronavirus, आता घेतोय जीव; धक्कादायक संशोधन

10 ते 15 वर्षांआधीच माणसांमध्ये पसरला Coronavirus, आता घेतोय जीव; धक्कादायक संशोधन

10 ते 15 वर्षांआधीच माणसांमध्ये पसरला Coronavirus, आता घेतोय जीव; धक्कादायक संशोधन

10 ते 15 वर्षांनी कोरोनाव्हायरसने (Coronavirus) स्वत:मध्ये बदल केलेत, ज्यामुळे लोकांचा जीव जातो आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 मार्च : साप, वटवाघूळ की पँगोलिन कोरोनाव्हायरस (Coronavirus) नेमका आला कुठून याबाबत अद्याप ठोस पुरावा सापडलेला नाही.  मात्र माणसांमध्ये हा व्हायरस जवळपास 10 ते 15 वर्षे आधीच पसरला असावा, अशी धक्कादायक माहिती संशोधनात समोर आली आहे. कॅलिफोर्नियातील स्क्रिप्स युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग, युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी आणि तुलेन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला. नेचर मेडिसीन (Nature Medicine) जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोरोनाव्हायरस जवळपास 10 ते 15 वर्षांपासून माणसांना आजारी करत असावा, आता तो इतका भयंकर झाला हे की, माणसांचा जीव घेऊ लागला आहे, असं या संशोधनात नमूद करण्यात आलं आहे. डेली मेलने याबाबत वृत्त दिलं आहे. हे वाचा -  ‘10 सेकंद श्वास रोखलात तर तुम्हाला कोरोना नाही’, सेल्फ टेस्टबाबत Fact Check शास्त्रज्ञांच्या मते, त्यावेळी हा व्हायरस पँगोलियनपासून माणसांमध्ये पसरला असावा मात्र त्याआधीही या व्हायरसचा मूळ स्रोत हा वटवाघूळच असावा. शास्त्रज्ञांनी या व्हायरसचा जेनेटिक अभ्यास केला. त्यामध्ये हा व्हायरस वटवाघळापासून आल्याचं समजतं आहे.  गेली 10 ते 15 वर्षे कोरोनाव्हायरस पँगोलिनमार्फत माणसांमध्ये पसरला असेल, मात्र त्यावेळी त्याचा प्रभाव कमी होता. हळूहळू या व्हायरसने स्वत:ला म्युटेट केलं म्हणजे बदललं. त्याने स्वत:भोवती काटेदार प्रोटिन विकसित केले. आता हा काटेदार प्रोटिनवाला व्हायरस माणसाच्या फुफ्फुसातील पेशींना नष्ट करत आहे, ज्यामुळे लोकांचा जीव जातो आहे. या अभ्यासात सहभागी नसलेले यूएस नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थचे डॉ. फ्रान्सिस कोलिन्स म्हणाले, “कोरोनाव्हायरस दीड दशकांपासून लोकांना आजारी पाडत आहे, असं असू शकतं. मात्र त्याचा परिणाम कमी झाला असेल. यावेळी व्हायरसने स्वत:मध्ये बदल करून स्वतला अधिक भयंकर बनवलं आहे, जेणेकरून जास्त लोकांचा जीव जाईल” प्राण्यांमधून माणसांमध्ये आणि माणसांमधून पुन्हा प्राण्यांमध्ये जाणं, यामुळे हा व्हायरस अधिकच घातक ठरतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. हे वाचा -  कोरोनाग्रस्त आईने Breasfeeding केल्याने बाळाला व्हायरसचा धोका असतो का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात