Home /News /maharashtra /

नागपूरमध्ये कडकडीत लॉकडाउन अन् चोरांनी फोडले बिअरबार, पाहा हा VIDEO

नागपूरमध्ये कडकडीत लॉकडाउन अन् चोरांनी फोडले बिअरबार, पाहा हा VIDEO

चोरांनी बंद असलेल्या बिअर बारमध्ये घुसून दोन ते तीन पोती भरून दारूच्या बाटल्या गायब केल्या आहे.

नागपूर, 31 मार्च : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. 14 एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन राहणार आहे.  पण, अशाही परिस्थितीच चोरांनी नागपूरमध्ये चोरांनी एका बिअर बारवर दरोडा टाकण्याची घटना घडली आहे. 21 दिवसांचा लॉकडाउन असल्यामुळे सर्वांनाच  घरात  राहणे बंधनकारक करण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. पण, यात व्यसनाधीन लोकांची मोठी पंचाईत झाली आहे. राज्यात 14 एप्रिलपर्यंत ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच दुकानं बंद ठेवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहे. परंतु, राज्यभरात संचारबंदी असतानाही नागपूरमधील सुविधा बिअरबार अँड रेस्टॉरंटमध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरांनी बंद असलेल्या बिअर बारमध्ये घुसून दोन ते तीन पोती भरून दारूच्या बाटल्या गायब केल्या आहे. हेही वाचा -VIDEO : 'मुंबईकरांनो मी तुमच्यासमोर हात टेकते', महिला सरपंचाला अश्रू अनावर आधीच संचारबंदी असल्यामुळे दूर-दूरपर्यंत कोणीही नव्हतं. त्यामुळे चोरट्यांनी आरामात दारूचा मोठा साठा लंपास केला आहे. बारच्या मागील भागातून 2 चोरट्यांची आतमध्ये प्रवेश केला.  दारू चोरून नेण्याचा हा सगळा प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी बारचालकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. बारमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेतला जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या