औरंगाबाद, 22 डिसेंबर: सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला भरधाव एसटी बसनं जोरदार धडक देऊन चिरडलं. या भीषण अपघातात एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. संतप्त नागरिकांकडून बसची तोडफोड करण्यात आली. शहरातील सिडको बस स्टँडजवळी ही दुर्दैवी घटना घटली.
घटना स्थळी मोठा जमाव जमला असून पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले आहे. त्यात रुग्णवाहिका वेळेवर न आल्यानं जखमी व्यक्तीला ऑटो रिक्षातून घाटी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यामुळे नागरिक आखणीच संतप्त झालं आहेत.
हेही वाचा...मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा.. असं म्हणत पठ्ठा थेट चढला टॉवरवर, पाहा VIDEO
मिळालेली माहिती अशी की, शहरातील सिडको बस स्थानकाजवळ मंगळवारी दुपारी हा भीषण अपघात झाला. सिडको बस स्थानकातून एक बस निघालीच होती. मात्र, चालकाचं बसवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बसनं सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचास्वाराला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवर मागे बसलेला तरुणाचा जागेवर मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीनं उपचारांसाठी शासकीय घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
औरंगाबाद: भरधाव बसनं सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला चिरडलं, तरुण जागेवरच ठार pic.twitter.com/Vy1L4TsjHo
— News18Lokmat (@News18lokmat) December 22, 2020
संतप्त नागरिकांनी बसच्या काचा फोडल्या...
शहरातील सिडको बस स्थानक भागात कायम वर्दळ असते. त्यात मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकी स्वार तरुणाची बळी गेला. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बसची तोडफोड केली. बसच्या काचा फोडल्या.
हेही वाचा...रामदास आठवलेंनी केला अजब दावा, COVID-19 व्हॅक्सिनबाबतही दिले संकेत
इतका मोठा अपघात झाल्यानंतरही रुग्णवाहिका वेळेत घटनास्थळी पोहोचली नाही. त्यामुळे जखमी व्यक्तीला अखेर ऑटो रिक्षातून घाटी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यामुळेही नागरितांनी संताप व्यक्त केला आहे. सिडको पोलीस घटना स्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.