बीड, 25 मार्च: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात जमावबंदी व संचारबंदीचे आदेश असताना बीड जिल्ह्यात पोलिस आणि नागरिकांमध्ये चांगलीच धुनश्चक्री उडाली. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे बुधवारी ही घडली. या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, लॉकडाऊन असताना सिरसाळा येथे काही पुरुष आणि महिला रस्त्यावर आले होते. पोलिसांनी त्यांनी समज देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. पोलिस आणि नागरिकांमध्ये चंगलीच धुमश्चक्री झाली. यात एक कॉन्स्टेबल जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दुसरीकडे, पोलिसांनीच आधी लाठीचार्ज केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या प्रकरणात सिरसाळा येथील वडार गल्लीमधील 9 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
लॉकडाऊनमध्ये धुमश्चक्री, रस्त्यावर आलेल्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला... LIVE VIDEO pic.twitter.com/8in7R93xd7
— News18Lokmat (@News18lokmat) March 25, 2020
हेही वाचा… हृतिकच्या घरी रहायला आली EX Wife, कोरोनाचा असाही परिणाम परळी येथील 90 भाविक वृंदावनमध्ये अडकले.. दरम्यान, देशात लॉकडाऊन केल्यामुळे तीर्थयात्रा व भागवत कथेला गेलेले बीड जिल्ह्यातील परळी शहरातील 90 महिला-पुरुष भाविक वृंदावन (उत्तर प्रदेश) येथे अडकले आहेत. रेल्वे रद्द झाल्याने या भाविकांवर मथुरा, वृंदावनमध्येच धर्मशाळेत अडकून पडण्याची वेळ आली आहे. देशात 22 मार्चला जनता कर्फ्यू व त्यानंतर लॉकडाऊन केल्याने 22 मार्चपासून रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत. यामुळे या 90 जणांना परळीकडे येता येत नाही. त्यात 25 मार्चपासून त्यांचे जेवणाचे हाल सुरू झाले आहेत. “कसंही करून आम्हाला परळीकडे येऊ द्या, आर्त हाक वृंदावन येथे अडकलेल्या भाविकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हेही वाचा… कोरोनाचे देशात सर्वाधिक रुग्ण मुंबईत, पण मुंबईकर अजूनही गंभीर नाहीत श्याम महाराज उखळीकर यांच्या भागवत कथेला परळी शहरातील संत सावता माळी नगर ,कृष्णा नगर सिद्धेश्वरनगर, किर्ती नगर, देशमुख गल्ली येथील 80 जण तसेच पानगाव ,परभणी व पंढरपूर येथील भाविक 16 मार्च रोजी परभणी येथून सचखंड एक्सप्रेसने वृंदावन येथे आयोजित भागवत कथा श्रवण कार्यक्रमला गेले होते. कार्यक्रम आटोपून 22 मार्चला सगळ्यांनी रेल्वेचं रिझर्व्हेशन केलं होतं. पण जनता कर्फ्यू, लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद केल्याने वृन्दावन मध्ये अडकलेल्या 90 जणांना परळी येथे येण्याची कुठलीही सुविधा नाही. पर्यायाने त्यांना आश्रममध्ये मुक्काम करावा लागत आहे. आम्हाला परळीकडे यायचे आहे. कसंही करून तिकडे आणा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भाविकांनी केली आहे. कोरोनाच्या आणिबाणीच्या परिस्थितीमुळे अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.

)







