मुंबई, 25 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्चपासून देशभरात लॉकडाउन जाहीर केलं. महाराष्ट्रात त्याआधीपासूनच धोका वाढल्याने संचारबंदी लागू आहे. पण तरीही राज्यात अनेक ठिकाणी लोक ही संचारबंदी आणि Coronavirus चा धोका गांभीर्याने घेत नाहीत, असं चित्र आहे. विशेषतः मुंबईत या संचारबंदीच्या उल्लंघनाचे जास्त प्रकार झालेले दिसले.
होम क्वारंटाइनचे आदेश असूनही काही जण मुंबईत राजरोस फिरताना आढळले आहेत. यामुळे अनेकांना धोका उद्भवू शकतो. पाच दिवसात मुंबई पोलिसांनी सरकारी देशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 178 जणांवर कारवाई केली आहे. 20 मार्च ते 25 मार्च दरम्यानची ही कारवाई आहे.
संचारबंदी असूनही लोक गटागटाने बाहेर पडत आहेत. कट्ट्यावर गप्पा मारतानाही दिसत आहेत. बुधवारी दिवसभरात पोलिसांनी अशा 48 जणांवर कारवाई केली. संचारबंदी कायदा 188 नुसार ही कारवाई करण्यात येत आहे.
कोरोनाचं संकट गंभीर होत असून आता संचारबंदीच्या कायद्याचं उल्लंघन केल्यास पोलिसांना अधिकार देण्यात आले आहेत. भाजीपाला, दूध, औषधं, किराणा अशा अत्यावश्यक गोष्टी सोडता इतर कारणांसाठी बाहेर पडायला मनाई आहे.
वाचा - देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 606 वर, प्रत्येकी पाचवा रुग्ण महाराष्ट्रातला
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त (coronavirus) रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाव्हायरसचे आणखी 6 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 122 वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये 5 आणि ठाण्यात एक रुग्ण आढळून आला आहे. सर्वाधिक रुग्ण सध्या मुंबईतच आहेत. मुंबईत 48 रुग्ण उपचार घेत आहेत. ही संख्या देशात सर्वाधिक आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
पिंपरी चिंचवड मनपा - १२
पुणे मनपा १८
मुंबई ४८
सांगली ९
नवी मुंबई,कल्याण डोंबिवली ६
नागपूर, यवतमाळ प्रत्येकी ४
अहमदनगर, ठाणे प्रत्येकी ३
सातारा, पनवेल प्रत्येकी २
उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार,पुणे ग्रामीण प्रत्येकी १
होम क्वारंटाइन असूनही पडले बाहेर
परदेशातून आलेल्या काही जणांना होम क्वारंटाइचे आदेश देण्यात आले आहेत. होम कोरनटाईन सांगितलेले रुग्ण बाहेर पडल्या प्रकरणी गेल्या 5 दिवसात 5 रुग्णांवर कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय मुंबई पोलिसांनी खालील कारणांसाठी कारवाई केली आहे.
- बेकायदेशीरपणे हाॅटेल चालवल्या प्रकरणी 21 आस्थापनांवर कारवाई
- तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या 12 आस्थापनांवर कारवाई
- मनाई केलेली अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्तची दुकानं उघडल्या प्रकरणी 74 आस्थापनांवर कारवाई
- 28 फेरीवाल्यांवर कारवाई
- सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्या प्रकरणी 10 जणांवर कारवाई
- संचारबंदीमध्ये अवैध वाहतूक केल्या प्रकरणी 28 जणांवर कारवाई
ठाण्यातही दुकानासमोर गर्दी केल्यास होणार कारवाई
ठाणे महापालिकेनेही निर्बंधांचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. दुकानदारांना घरपोच सेवा देण्याची ठाणे मनपाने विनंती केली आहे. दुकानांवर समोर गर्दी केल्यास आता कारवाई होणार आहे. दुकानासमोरच्या रांगेत प्रत्येकाने 3 फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे.
CORONA चा 'खरा' अर्थ सांगणाऱ्या कोल्हापूरच्या पठ्ठ्याचं पंतप्रधानांकडून कौतुक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.