हृतिकच्या घरी रहायला आली EX Wife, कोरोनाचा असाही परिणाम

हृतिकच्या घरी रहायला आली EX Wife, कोरोनाचा असाही परिणाम

हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खान यांनी घटस्फोट घेऊन 6 वर्षे झाली आहेत.

  • Share this:

मुंबई, 25 मार्च : हृतिक रोश आणि त्याची पत्नी सुझान खान यांनी घटस्फोट घेऊन बरीच वर्षे झाली. दोघेही त्यानंतर त्याच्या आयुष्यात बिझी आहे. मात्र घटस्फोटानंतरही त्यांनी मुलांचा सांभाळ करताना कोणतीच कमतरता ठेवली नाही. वेगळं झाल्यानंतर त्यांनी मुलांना आई-वडिलांचं प्रेम दिलं आहे. त्यासाठी सोबत सुटी साजरी करण्यासाठीही ते गेले. सध्या कोरोना व्हायरसमुळे लोक घरांमध्ये बंद आहेत. काही क्वारंटाइन आहेत. या परिस्थितीत सुझानने एक मोठा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोना व्हायरसमुळे क्वारंटाइन आहेत. त्यामुळं ते घरातच वेळ घालवत आहेत. त्यातच मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात 21 दिवस लॉकडाउनची घोषणा केली. त्यामुळे मुलांना आई-वडिलांचं प्रेम देण्यासाठी सुझानने हृतिकच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला. हृतिकसोबत त्याची दोन्ही मुले राहतात. आता सुझानही त्याच्यासोबत जुहू इथं असलेल्या घरात शिफ्ट झाली आहे.

ऋतिक रोशनने आपल्या एक्स वाईफचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिच्या निर्णयाबद्दल तिचे आभार मानले आहेत. ऋतिक रोशननं भावनिक कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे. आपला देश कोरोना व्हायरससारख्या भयंकर आजाराचा सामना करत आहे. अशा स्थितीत देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या संकटाचा सामना आपण सर्वचजण करत आहोत. अशा परिस्थित मुलापासून दूर राहण्याचा विचार करणंही फार कठीण झालं आहे. सोशल डिस्टंसिंगची अनिश्तितता किती काळापर्यंत चालेल हे माहीत नाही मात्र हे बघून खूप समाधान मिळत आहे की या महामारीच्या संकटावर मात कऱण्यासाठी सगळं जग एकत्र आलं आहे. माणुसकीच्या नात्यानं सगळं जग एकत्र आलं असताना आई-वडिलांचीनीही आपल्या पाल्याची जबाबदारी विभागून घेतली पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना दोघांचीही गरज असल्यानं दोघांच्याही जवळ ठेवणं दोघांचा सारखा वेळ देणं आवश्यक आहे.

हा फोटो माझ्या एक्स वाईफचा आहे. काही काळासाठी आपल्या पाल्याची जबबदारी आणि त्याचा वेळ देण्यासाठी स्वत:चं घर सोडून आमच्या घरी राहण्यासाठी आली आहे. कारण या महामारी संकटात अनिश्चित काळासाठी आम्हाला आमच्या मुलापासून दूर राहायला लागू नये म्हणून ती आमच्या घरी आली आहे. त्यासाठी खूप थँक्यू सुजैन. पलकत्वाचं महत्त्व समजून या प्रवासामध्ये सहकार्य केलं आणि समजून घेतल्याबद्दल सुजैन, धन्यवाद. आमची मुले ही कहाणी सांगतील ज्यासाठी आपण त्यांच्यासाठी तयारी करीत आहोत. मी आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो, आपल्या सर्वांना आपले प्रेम, सहानुभूती आणि धैर्य व्यक्त करण्याचा योग्य मार्ग मिळाला पाहिजे.

 

View this post on Instagram

 

. It is unimaginable for me, as a parent, to think of having to be separated from my children at a time when the country is practicing lockdowns. . It is heartwarming to see the world come together as one in this time of deep uncertainty and possibility of months of social distancing and potential lockdowns for several weeks perhaps . . While the world talks about humanity coming together, I think it represents more than just an idea especially for parents sharing custody of their kids. How to keep their kids close to them without infringing on the right of the other who also has an equal right to be with his/her children. . This is a picture of dear Sussanne (my ex wife) , who has graciously volunteered to temporarily move out of her home so that our children are not disconnected indefinitely from either one of us. . Thank you Sussanne for being so supportive and understanding in our journey of co-parenting. . Our children will tell the story we create for them. . I hope and pray that in order to safeguard the health of ourselves and our loved ones, we all find our way to express love, empathy, courage, strength with an open heart ❤️. . #beopen #bekind #bebrave #responsibility #coexist #empathy #strength #courage #oneworld #humanity #wecanfighththis #loveoverfear

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

हृतिक सुझानचा घटस्फोट होऊन 6 वर्षे झाली. तरीही त्यांची मैत्री टिकून आहे. मुलांचा वाढदिवस, घरात पार्टी, न्यू इयर पिकनिक याशिवाय बाहेरही अनेकदा ते एकमेकांसोबत दिसतात. सोशल मीडियावरूनही ते अधुनमधून एकत्र फोटो शेअर करत असतात. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, आम्ही दोघे विभक्त झालो आहोत पण मुलांसाठी मात्र कुटुंब म्हणून एकत्रच आहोत. दोघांनी 2014 मध्ये घटस्फोट घेतला होता.

हे वाचा :

#21दिवस : आधी घासली भांडी आता घराची साफसफाई, कतरिनाचा नवा VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2020 09:49 PM IST

ताज्या बातम्या