Home /News /maharashtra /

नांदेडमध्ये गुरुव्दारा दर्शनासाठी आलेले 3 हजार भाविक अडकले

नांदेडमध्ये गुरुव्दारा दर्शनासाठी आलेले 3 हजार भाविक अडकले

लॉकडाउन आणि राज्यात संचार बंदी लागली. रेल्वे, खाजगी वाहनं बंद झाल्याने हे भाविक नांदेड मध्ये अडकून पडले आहेत.

नांदेड 26 मार्च :  शिखांसाठी अतिशय पवित्र असलेल्या शहरातल्या सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी आलेले तब्बल तीन हजार भाविक अडकून पडले आहेत. 15 मार्चपूर्वी पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतून हे भाविक नांदेडला दर्शनासाठी आले होते. रेल्वे, विमान तसच खाजगी वाहनांनी हे भाविक नांदेडला आले होते, पण नंतर लॉकडाऊन आणि राज्यात संचार बंदी लागली. रेल्वे, खाजगी वाहनं बंद झाल्याने हे भाविक नांदेड मध्ये अडकून पडले आहेत. काही भाविक ट्रकने पंजाबसाठी निघाले होते. पण मध्यप्रदेश पोलिसांनी त्यांना परत पाठवले आहे. सध्या सर्व भाविक गुरुद्वारात राहत आहेत. त्यांची सर्व व्यवस्था गुरुद्वारा बोर्डाकडून केली जात आहे. पण भाविकांना त्यांचा घरी जायचं आहे. यात महिला, पुरुष, वृद्ध तसच लहान मुलांचा देखील समावेश आहे. दरम्यान गुरुद्वारा बोर्डाकडून त्यांना परत पाठवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या भाविकांसाठी एक विशेष रेल्वे किंवा राजस्थान, मध्य प्रदेश ,हरियाणा सरकारला सांगून खाजगी वाहनाने जाऊ देण्याची विनंती केली जात आहे. याबाबत गुरुद्वारा बोर्ड महाराष्ट्र सरकार आणि पंजाब सरकारच्या संपर्कात आहे अशी माहिती बोर्डाचे सदस्या रवींद्र सिंग यांनी दिली. 'आता फक्त 'हे' 3 पर्याय आहेत', अमोल कोल्हेंनी करून दिली गंभीर धोक्याची जाणीव महाराष्ट्रात Coronavirus चा धोका वाढतोच आहे. दिवसभरात दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्णांची संख्याही वाढून 125 झाली आहे. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यापूर्वी नवी मुंबईत एकीचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना मृत्यूंची संख्या राज्यात 5 झाली आहे. सकाळी वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला.

मोदी सरकारच्या मोठ्या घोषणांवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

देशभरात सर्वाधिक रुग्ण राज्यात सापडले आहेत. नागपुरात आणखी एक 42 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 125 झाला आहे. वाशीत झालेल्या मृत्यूविषयी मिळालेल्या माहितीनुसार, 24 मार्चला या महिलेचा मृत्यू झाला होता. आज शवविच्छेदन अहवाल हाती आला असता हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं समोर आलं. मृत महिला ही उपचारासाठी वाशीमधल्या 2 खासगी रुग्णालयात गेली होती, अशीही माहिती समोर येत आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:

Tags: Nanded

पुढील बातम्या