मोदी सरकारच्या मोठ्या घोषणांवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मोदी सरकारच्या मोठ्या घोषणांवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

'नियमित आढावा घेऊन वेळोवेळी नवे पॅकज जाहीर होण्याची गरज आहे,' असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

  • Share this:

मुंबई, 26 मार्च : 'केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केल्याच्या निर्णयाचं स्वागत आहे. शिवाय महाराष्ट्र व देशासमोरचं ‘कोरोना’चं भीषण संकट लक्षात घेता केंद्र सरकारकडून अशा ‘पॅकेज’ची गरज होती. या ‘पॅकेज’चे लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यशासन सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल,' असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

‘कोरोना’च्या संकटाची भीषणता पाहता केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज हे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यासाठी आहे. यापुढच्या काळात संकट कसं वळण घेतं याचा नियमित आढावा घेऊन वेळोवेळी नवे पॅकज जाहीर होण्याची गरज आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

'पंतप्रधान अन्न कल्याण योजना आणि डीबीटी अशा दोन माध्यमांद्वारे ही जनतेला मिळणार आहे. कोरोनाचं संकट हे तीन महिन्यांसाठी चालेल हे गृहित धरुन हे पॅकेज तयार केलं असलं तरी त्याचं वितरण तात्काळ होणं अपेक्षित आहे. राज्यात व देशात तात्काळ आरोग्यसुविधा उभारण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध झाला पाहिजे,' असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोनाचं संकट, केंद्र सरकारच्या 7 मोठ्या घोषणा

1. पंतप्रधान गरीब कल्याण योजना - 80 कोटी लोकांना याचा फायदा देण्यात येणार आहे. या सर्वांना आता मिळत असलेल्या धान्यापेक्षा 5 किलो गहू / 5 किलो तांदूळ जास्त मिळतील. पुढील 3 महिन्यांसाठी प्रत्येकी 5 किलो धान्य 1 किलो डाळ दिली जाईल.

2. आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधितांची काळजी घेणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांच्या विम्याचं कवच, 20 लाख कर्मचाऱ्यांना फायदा

3. उज्ज्वला लाभार्थ्यांना पुढील 3 महिन्यांसाठी मोफत एलपीजी सिलिंडर मिळतील, 8.3 कोटी बीपीएल कुटुंबांना लाभ होईल

4. 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या विधवांना आगामी दोन महिन्यांसाठी 1 हजार रुपयांची मदत दिली जाईल, 3 कोटी गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांगांना लाभ होईल

5. देशातील 8 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये टाकले जाणार : अर्थमंत्री

6. मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आहे. मजुरांच्या दैनंदिन वेतनात 200 रुपये वाढवण्यात आले आहेत.

7. 20 कोटी महिलांना दरमहा मिळणार 500 रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2020 04:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading