Home /News /news /

मुंबई पालिकेची मोठी कारवाई, मृतदेह अदलाबदल प्रकरणात 2 कर्मचाऱ्यांना केलं निलंबित

मुंबई पालिकेची मोठी कारवाई, मृतदेह अदलाबदल प्रकरणात 2 कर्मचाऱ्यांना केलं निलंबित

मृत व्यक्तिचं शवविच्छेदन करताना मूत्रपिंड (किडनी) काढण्यात आल्याच्या आरोप चुकीचा असल्याचंही पालिकेनं म्हटलं आहे.

मुंबई, 14 सप्टेंबर : मुंबई महानगरपालिकेच्या शीव इथल्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याप्रकरणी शवागारातील 2 कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आलं आहे. तर या प्रकरणाची कसून चौकशी सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर अशा चुकांचं महानगरपालिका मुळीच समर्थन करणार नसून या दुर्दैवी प्रकारात दोषी आढळल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. तर, मृत व्यक्तिचं शवविच्छेदन करताना मूत्रपिंड (किडनी) काढण्यात आल्याच्या आरोप चुकीचा असल्याचंही पालिकेनं म्हटलं आहे. सायन इथल्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात अंकुश सुरवडे (वय 26) यांना दिनांक 28 ऑगस्ट 2020 रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. एका अपघातात जबर जखमी झाल्याने अंकुश सुरवडे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. पण दुर्दैवाने अंकुश यांचं काल सकाळी निधन झालं. यानंतर विहित प्रक्रियेनुसार त्यांचे शव उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आलं. SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! FD दरात कपात, काय आहेत नवीन व्याज दर? दरम्यान, सायन रुग्णालयातच हेमंत दिगंबर यांना शनिवार, 12 सप्टेंबर 2020 रोजी मृतावस्थेतच त्यांच्या नातेवाईकांनी आणले होते. अंकुश व हेमंत या दोन्ही रुग्णांच्या शवांची उत्तरीय तपासणी काल सकाळी करण्यात आली. त्यानंतर दोन्ही शव रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले होते. अंकुश सुरवडे यांच्या नातेवाईकांनी काल सकाळीच रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून दुपारी 4 वाजेच्या सुमारास येऊन ते अंकुश यांचा शव ताब्यात घेतील असं कळवलं होतं. 'कोणाचा बँड वाजतो तर कोणाचा ब्रँड....' 'ठाकरे'ब्रँड वरून मनसेची जहरी टीका दरम्यानच्या काळात, हेमंत यांचे नातेवाईक रुग्णालयात आले. त्यांनी अंकुश यांचा मृतदेह हा हेमंत यांचा असल्याचं ओळखून, सर्व प्रक्रिया पार पाडून, पोलीसांच्या स्वाक्षरीनंतर नेला. प्रत्यक्षात अंकुश यांचे शव हे हेमंत यांचे शव असल्याचे समजून सोपवण्यात आले. हेमंत यांच्या नातेवाईकांनी शव ताब्यात घेतल्यानंतर अंत्यसंस्काराचे विधीदेखील पार पाडले. दिल्ली हिंसा: UAPA मध्ये उमर खालिदला अटक, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कारवाई त्यानंतर, अंकुश यांचे नातेवाईक रुग्णालयात आले व त्यांनी शव ताब्यात देण्याची विनंती केल्यानंतर ही चूक घडल्याचे लक्षात आले. या प्रकारामुळे अंकुश यांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला आहे. यानंतर पोलीस प्रशासनालाही प्राचारण करण्यात आलं. घडल्या चुकीमुळे एकंदर परिस्थिती हाताबाहेर जावू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. सदर, शव अदलाबदल होण्याचा प्रकार हा दुर्दैवी असून घडलेल्या चुकीबाबत प्रशासन दिलगीर आहे असं महापालिकेने म्हटलं आहे. या घटनेतील चुकीबद्दल, शवागारातील संबंधित दोन कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Mumbai

पुढील बातम्या