TikTok Video : सापाचे नाव जरी ऐकले तरी लोक घाबरून जातात. खरंतर सापाच्या सर्वच प्रजाती विषारी नसतात. तरीसुद्धा बर्याच वेळा साप चावल्यानंतर इतकी भीती वाटते की काही लोक हृदयविकाराच्या झटक्याने मरतात. तथापि, लोकांमधील साप हा केवळ घाबरण्याचा विषय नाही तर कुतूहलही आहे. कारण, म्हणजे जेव्हा साप कात टाकतो. सापाला कात टाकताना अनेकांनी पाहिलं असेल. तुम्ही जरी नसेल पाहिलं तरी TikTok Video मध्ये साप काटतानाचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल होत आहे. या TikTok व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कशा प्रकारे काळ्या आणि पिवळ्या रंगाचा हा साप कात टाकत आहे. सापाची ही कात अतिशय पारदर्शक आहे. आतापर्यंत 2.8 मिलियन लोकांनी हा व्हिडिओ आवडला आहे आणि असंख्य लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत.
@brianbarczyk Soothing sounds of a snake shedding! #asmr #snake #shed #reptile #animal #4u ♬ original sound - brianbarczyk
खरंतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर शहारे येतात. पण साप कात का टाकतो याविषयी तुम्हाला माहित आहे काय? कात म्हणजे सापाची त्वचा असते. जर एखादा आजार किंवा इंनफेक्शन झालं तर साप त्याची खराब झालेली त्वच्या काढून टाकतो. आणि त्यानंतर त्याच्या शरीरावर नैसर्गिकरित्या पुन्हा त्वचा येते.