मराठी बातम्या /बातम्या /देश /व्यक्तीवर प्रेम झालं पण नाकाने केला घात! नवरीने असं काही केलं की नवरा पोहोचला कोर्टात

व्यक्तीवर प्रेम झालं पण नाकाने केला घात! नवरीने असं काही केलं की नवरा पोहोचला कोर्टात

नुसरतने आपल्या लग्नात प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेला लेहंगा घातला होता. तर निखीलने सब्यसानेच डिझाइन केलेली शेरवानी घातली होती.

नुसरतने आपल्या लग्नात प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेला लेहंगा घातला होता. तर निखीलने सब्यसानेच डिझाइन केलेली शेरवानी घातली होती.

प्रेमाची सुरुवातच थेट कोर्टातून, नवरीने असं काही केलं की नवऱ्याने ठोकला फसवणूकीचा खटला.

बेंगळुरू, 05 जानेवारी : सध्या दिवसागणीक लग्नात अडथळे किंवा लग्न मोडल्याच्या घटना ऐकायला मिळतात. लग्न मोडण्यात सर्वात जास्त मुलींची संख्या आहे. मात्र तुम्ही कधी लांब नाक आहे म्हणून लग्न मोडल्याचे ऐकले आहे? असा प्रकार बेंगळुरूमध्ये घडला आहे. येथे एका मुलीने मुलाचे नाक लांब असल्यामुळं लग्नास नकार दिला. यानंतर नवऱ्या मुलाने चक्क मुलीला कोर्टात खेचले.

बेंगळुरूमधील 35 वर्षांच्या सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या रमेशचे लग्न रश्मी नावाच्या मुलीशी ठरले होते. दोघांची भेट ऑनलाईन साइटवरून झाली होती. रमेश यांच्या म्हणण्यानुसार, रश्मीशी अनेक महिने ऑनलाइन संवाद साधल्यानंतर 13 ऑगस्ट रोजी बेंगळुरू येथे त्यांची भेट झाली. महत्त्वाचे म्हणजे रश्मी अमेरिकेत नोकरी करते.

वाचा-पॉर्न पाहाताना तुमचा VIDEO होऊ शकतो रेकॉर्ड?

30 जानेवारी रोजी होणार होते लग्न

26 ऑगस्ट रोजी दोन्ही कुटुंबांची भेट झाली आणि 9 सप्टेंबर 2019 रोजी रमेश आणि रश्मी यांचा साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर दोघांच्या लग्नाच्या तयारीलाही सुरुवात झाली. दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने 30 जानेवारी 2020 रोजी लग्न करण्याचे ठरले. दरम्यान, लग्नाची तारीख निश्चित झाल्यानंतर रश्मी परत अमेरिकेत गेली. जेव्हा त्याने लग्नाची तयारी सुरू केली. एवढेच नाही तर तिरुमालामध्ये पाहुण्यांसाठी रुपही बुक करण्यात आली. त्यासाठी 4 लाख रुपये खर्चही करण्यात आले.

वाचा-ऑस्ट्रेलियात भीषण आग, 5 कोटी प्राण्यांनी गमावला जीव

मुलीविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान रमेशने  दिलेल्या माहितीनुसार, एक दिवस अचानक रश्मीच्या वडिलांनी फोन करून लग्न मोडत असल्याचे सांगितले. रमेशने सांगितले की जेव्हा त्याने रश्मीला बोलावले आणि त्याचे कारण विचारले तेव्हा त्याने आपली चेष्टा केली की तुमचे नाक लांब आणि विकृत आहे. ज्यासाठी त्याने प्लास्टिक सर्जरी केली पाहिजे. त्यानंतर रश्मीने रमेशचा नंबरही ब्लॉक केला. यानंतर रमेशने रश्मीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी आयपीसीच्या कलम 417, 420 अन्वये रश्मी आणि तिच्या कुटुंबीयांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वाचा-'मातोश्री'बाहेरील शेतकऱ्याला भेट नाकारल्यानंतर बच्चू कडू यांचा सरकारला घरचा अहेर

First published:
top videos