...तर अख्खं मंत्रालय पेटवून देऊ, अखिल भारतीय मराठा महासंघाचा संतप्त इशारा

...तर अख्खं मंत्रालय पेटवून देऊ, अखिल भारतीय मराठा महासंघाचा संतप्त इशारा

सरकार जर त्यांचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी मंत्रालयाचा एक मजला जाळू शकते तर

  • Share this:

जालना, 7 नोव्हेंबर: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावर जालन्यातील (Jalna) मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठ्यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. सरकार जर त्यांचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी मंत्रालयाचा (Maharashtra Mantralay) एक मजला जाळू शकते तर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी न लावल्यास मराठा समाज अख्खं मंत्रालय पेटवू शकतो, असा संतप्त इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख (Arvind Deshmukh) यांनी दिला आहे.

हेही वाचा.. शिवसेनेच्या काळात ST महामंडळाची वाट लागली, काँग्रेसचे नेत्याचा सरकारला घरचा आहेर

अरविंद देशमुख म्हणाले, अगोदरच्या सरकारचा धोरण म्हणजे शेतकऱ्यांचं मरण, असा होता तर आताच्या सरकारचा धोरण म्हणजे मराठ्यांच्या मुलांचं मरण, असं आहे. मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लगेपर्यंत शाळा, महाविद्यालय प्रवेशासह नोकर भरती न करण्याची मागणी अरविंद देशमुख यांनी केली आहे.

दुसरीकडे, मराठा ठोक मोर्चाच्या वतीने शनिवारी 'पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा' काढण्यात आला. नामदेव पायरीचं दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सकल मराठा समाजाच्या पायी दिंडीला सुरूवात झाली आहे.

पंढरपुरातून पायी चालत मराठा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, पंढरपूर पोलीस मुख्यालयासमोर मराठ्यांचा आक्रोश मोर्चा अडवण्यात आला आहे.

पोलीस मराठा कार्यकर्त्यांना धरपकड करण्याच्या तयारीत असल्यानं वातावरण तापलं आहे. पोलीस आणि मराठा समन्वयकामध्ये बोलणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पंढरपूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे.

समन्वयकांना घेतलं ताब्यात...

पंढरपूर पोलिसांनी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांना ताब्यात घेतलं असून त्यांना पुण्याच्या दिशेने नेण्यात आलं आहे. पायी दिंडीला पोलिस प्रशासनानं परवानगी नाकारली आहे. दहा खासगी वाहनातून पोलीस बंदोबस्तात मराठा समन्वयक पुण्यामध्ये पोहोतील. त्यानंतर पुण्यात मुख्य सचिवांसोबत बैठक होईल, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, सुमारे 500 पोलीस तैनात असून ड्रोनद्वारे हालचालींवर नजर ठेवली जाईल.

आंदोलकांना ठेवलं नजरकैदेत...

दुसरीकडे, पंढरपूरकडे निघालेल्या मराठा तरुणांना पोलिसांनी अडवलं आहे. 144 कलम लागू असल्याने त्यांना पंढरपुरात जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला. कळंब पोलिसांनी आंदोलकांना नजरकैदेत ठेवलं आहे. 149 नुसार 12 कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

हेही वाचा...'...तरच फटाक्यांशिवाय दिवाळी होणार', भाजप खासदाराची वादग्रस्त पोस्ट

मराठा समाजात तीव्र खदखद...

मराठा आरक्षणा संदर्भात सरकार योग्य उपाययोजना करत नसल्या कारणाने समाजामध्ये तीव्र खदखद आहे. ती आमदार विनायक मेटे यांच्या मशाल मार्च व मराठा क्रांती ठोक मोर्चा यांचा दिंडीमधून व्यक्त होत आहे. सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणा संदर्भात ठोस उपाय योजना करावी, अशी मागणी बीडमधील मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, वकील आणि मराठा समाजातील तरुण अशा भावना व्यक्त करत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: November 7, 2020, 2:08 PM IST

ताज्या बातम्या