मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेनेच्या काळात ST महामंडळाची वाट लागली, काँग्रेसचे नेत्याचा सरकारला घरचा आहेर

शिवसेनेच्या काळात ST महामंडळाची वाट लागली, काँग्रेसचे नेत्याचा सरकारला घरचा आहेर

दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
लक्ष्मण घाटोळ, (प्रतिनिधी) नाशिक, 7 नोव्हेंबर: दिवाळीच्या (Diwali Festival) तोंडावर राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक महिन्यांचे वेतन रखडल्यानं एसटी कर्मचारी ( Maharashtra ST) आता आक्रमक झाले आहेत. थकीत वेतन (Salary) तात्काळ दिले नाहीत तर एसटी कर्मचारी संपाचं (ST Employee strike) अस्त्र उपसणार असल्याचा इशारा इंटकचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड (Congress Leader Jaiprakash Chhajed) यांनी दिला आहे. शिवसेनेच्या शिवसेनेच्या काळात खासगी कंत्राटदार आणल्याने एसटी महामंडळाची वाट लागली, असा आरोप जयप्रकाश छाजेड यांनी करत सरकारला घरचा आहेर दिला आहे. हेही वाचा...शिवसेनेला धक्का! महिला आमदाराचं जात प्रमाणपत्र रद्द, राजकीय वर्तुळात खळबळ अन्यथा महामंडळावर फौजदारी गुन्हा एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळी आधी दिले नाहीत तर आम्ही महामंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करु, असा इशारा देखील जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जयप्रकाश छाजेड म्हणाले की, कोरोनाच्या काळात एसटी सेवा बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलं. गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनच मिळाले नाही. कोरोना काळात काम करुनही एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे संसाराचा गाडा रेटायचा तरी कसा? हा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यात दिवाळी सण तोंडावर आला आहे, सण साजरा करायचा तरी कसा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. दरम्यान, एसटी कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही विनवणी केली होती. परंतु, अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. त्यामुळे आता कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे पगार द्या, 1936 च्या कायद्यान्वये महामंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करु, अशी भूमिका इंटकने घेतली आहे. हेही वाचा...धनत्रयोदशी आधी स्वस्त सोने खरेदीची सुवर्णसंधी! वाचा काय आहे मोदी सरकारची योजना  'एसटी बचाव-कामगार बचाव' मार्च ते ऑगस्ट या कालावधीत एसटी महामंडळाचं सुमारे 3366 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे एसटीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर इंटककडून राज्यव्यापी अभियान राबवले. या अंतर्गत राज्यातील सर्व आमदार आणि खासदार यांना निवेदन देऊन, 'एसटी बचाव-कामगार बचाव' असे साकडं घातलं होतं.
First published:

पुढील बातम्या