जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला! नरेंद्र पाटलांची सरकारवर अत्यंत खालच्या भाषेत टीका, म्हणाले...

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला! नरेंद्र पाटलांची सरकारवर अत्यंत खालच्या भाषेत टीका, म्हणाले...

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला! नरेंद्र पाटलांची सरकारवर अत्यंत खालच्या भाषेत टीका, म्हणाले...

अशोक चव्हाण यांनी मराठा असं नाव लावू नये, अशा शेलक्या शब्दांत नरेंद्र पाटलांचा टोला

  • -MIN READ
  • Last Updated :

मुजीब शेख, (प्रतिनिधी) नांदेड, 8 नोव्हेंबर: मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर (Maharashtra Government) निशाणा साधला आहे. नरेंद्र पाटील यांनी सरकारवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे. नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर टीका केली. तर तत्कालीन सरकारचे कौतुक केलं. हेही वाचा… गौरी गडाख यांच्या मृत्यूबाबत झाला मोठा खुलासा, पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर तत्कालीन सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं. पण सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला ते टिकवता आलं नाही. जेव्हा लाखोचे मोर्चे निघाले तेव्हा त्या काळातील विरोधीपक्षाचं आमदार-खासदार मोर्चात सहभागी झाले. अशोक चव्हाण देखील सहभागी झाले होते. पण आता सत्ता असताना, ते स्वत: उपसमितीचे अध्यक्ष असताना त्यांना आरक्षण टिकवता आलं नाही. अशोक चव्हाण यांनी मराठा असं नाव लावू नये, अशा शेलक्या शब्दांत नरेंद्र पाटील यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला. अशोक चव्हाण यांना आरक्षणाची गरज नाही. पण शेतकरी कष्टकरी कामगार यांना आरक्षण हवं आहे. याचं भान त्यांनी ठेवावं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सर्वाधिक मराठा आमदार आहेत. पण ते विधानसभेत बोलत नाहीत. त्यांना लाज नाही. ते सर्व घरात दरवाजा लावून बसले आहेत. त्यांच्या ढुंगनावर लाथ मारा, असं नरेंद पाटील यांना सांगितलं. दरम्यान, मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाणांना हटवावं आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदेना मराठा समितीचे अध्यक्षपद द्यावं, असं नरेंद्र पाटील यांनी कराड येथे सांगितलं होतं. अशोकराव चव्हाणांनीच मराठा समाजाला थर्ड लावला, असा आरोप देखील नरेंद्र पाटील यांनी केला होता. हेही वाचा.. मराठा आरक्षणासाठी बुद्धिवंतांची समिती स्थापन करा, संभाजीराजेंचा चव्हाणांना टोला माजी मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटीला यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न योग्य पध्दतीने हाताळला होता, असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं. विद्यामान अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात