मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मराठा आरक्षणासाठी बुद्धिवंतांची समिती स्थापन करा, संभाजीराजेंचा अशोक चव्हाणांना खोचक टोला

मराठा आरक्षणासाठी बुद्धिवंतांची समिती स्थापन करा, संभाजीराजेंचा अशोक चव्हाणांना खोचक टोला

आज मराठा समाज मुख्य प्रवाहात का नाही?

आज मराठा समाज मुख्य प्रवाहात का नाही?

आज मराठा समाज मुख्य प्रवाहात का नाही?

नांदेड, 8 नोव्हेंबर: 'छत्रपती शाहू महाराजांनी 200 वर्षांपूर्वी बहुजन समाजाला (OBC) आरक्षण मिळवून दिलं होतं. त्यांनी फक्त मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. तर त्या वेळीच्या बहुजन समाजातही मराठा समाजाचा (Maratha Community) सहभाग होता. मग, आज मराठा समाज मुख्य प्रवाहात का नाही? असा सवाल भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती (BJP MP Sambhajiraje chhatrapati) यांनी सरकरला केला आहे.

संभाजीराजे यांनी नांदेड (Nanded) येथील मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याला संबोधित करताना सरकारवर निशाणा साधला.

हेही वाचा..किमान प्रवक्ता केलं असतं तर भाजपला तोंड वर काढू दिलं नसतं, शिवसेना नेत्याची खदखद

मराठा आरक्षणासाठी बुद्धिवंत लोकांची समिती स्थापन करा, असं सांगत संभाजीराजेंनी काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांवर (Ashok Chavan) खोचक टीका केली. सुप्रीम कोर्टात भूमिका मांडताना या समितीचा सल्ला घ्या. इथून पुढे चुका न करण्याचा सल्ला संभाजीराजे यांनी सरकारला केलं आहे.

मराठा समाज ओबीसीविरोधात नाही...

संभाजीराजे म्हणाले, माझा लढा केवळ मराठा समाजासाठी नाही, तर माझा लढा संपूर्ण बहुजन समाजासाठी आहे. न्याय द्यायचा असेल तर सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे. मी नेतृत्वासाठी बाहेर पडलो नाही, घटक म्हणून समाजासाठी काम करतो आहे. मराठा समाजाचा सेवक म्हणून काम करायचं आहे, असं मराठा समाज ओबीसीविरोधात नाही, असंही संभाजी राजे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

न्याय द्यायचा तर समान द्या...

अनेक कार्यक्रमांना हजारो लोक जमतात. मराठा मेळाव्याला फक्त अडीचशे लोकांना परवानगी. न्याय द्यायचा तर समान न्याय द्या, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला खडसावून सांगितलं.

मास्क घाला त्याशिवाय जवळ यायचं नाही...

मराठवाड्याच्या दौऱ्यात लोक मास्कच घालत नाही. इतके बिनधास्तपणे नांदेडचे लोक राहतात. आता ज्यांनी घातलेत त्यांनी मी आलोय म्हणून घातलेत. मी त्यांना सांगितलं की मास्क घाला त्याशिवाय जवळ यायचं नाही. पण माझा मनापासून इच्छा आहे की लवकरात लवकर सर्वांनी जवळ यावं. लोकंच जवळ आली नाही तर येऊन उपयोग नाही.

हेही वाचा...गौरी गडाख यांच्या मृत्यूबाबत झाला मोठा खुलासा, पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर

खांद्याला धक्काबुक्की झाल्याशिवाय छत्रपती घराण्याचं आणि मावळ्यांचं नातंच होऊ शकत नाही. समाज अडचणीत असताना त्याचे धक्केबुक्के खाल्ले पाहिजे. यातूनच प्रेम निर्माण होतं. यातूनच जीवाचे संबंध तयार होतात. हेच संस्कार आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि शाहू महाराजांनी दिले असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं.

First published:

Tags: Maratha kranti morcha, Maratha reservation, Protest maratha kranti morcha, Sakal maratha morcha, Sambhajiraje chhatrapati, मराठा आरक्षण maratha aarakshan