मोहन जाधव, (प्रतिनिधी) रायगड, 9 जून: मानवानं किती प्रगती केली तरी त्याला निसर्गाच्या प्रकोपापुढे सर्वांनाच हतबल व्हावं लागतं. निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. असंख्य संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आयुष्यभर काबाडकष्ट करून बनवलेल्या स्वप्नातील घरादारांचा अक्षरश: चुराडा केला. हजारो कुटुंब उघड्यावर आली आहेत. पाच दिवसांनंतरही या निराधारांचे अश्रू अजून थांबलेले नाहीत. बेघर झालेल्या कुटुंबांना बस डेपोचा आधार मिळाला आहे.
पाच दिवसांनंतरही या निराधारांचे अश्रू अजून थांबलेले नाहीत...बेघर झालेल्या कुटुंबांना मिळाला बस डेपोचा आधार.... pic.twitter.com/wgAWkMmsLL
— News18Lokmat (@News18lokmat) June 9, 2020
हेही वाचा.. पुण्यात राजकारण तापलं! भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर केला वादग्रस्त प्रस्ताव राज्याच्या एसटी महामंडळाचे हे श्रीवर्धन बस आगार सध्या या आगारामध्ये बसेस नाहीत तर चक्क माणसे राहतात. तीही उघड्यावर. निसर्ग चक्रीवादळात मेटकर्णी हे शहराच्या उंबरठ्यावरील गाव आणि गावतील घरे उध्वस्त झाले आहेत. स्वतःच्या हक्काचे कष्टाने बनवलेले छप्पर उडाल्याने बेघर झालेल्या या माणसांना अद्यापपर्यंत शासनाने मदतीचा हात दिलेला नाही. त्यामुळे गेली पाच दिवस यांनी आपल्या लेकराबाळांसह आपला संसार असा उघड्यावरती थाटला आहे. जिथे माणसे गाडीची वाट पहात असतात, तिथे चक्क चुली पेटल्या आहेत. तर जिथे भटकी जनावरे आश्रय घेतात. तिथे आभाळ पांघरून यांना झोपावे लागत आहे. आतापर्यंत साधी विचारपूस देखील करायला कोणी आलेला नाही. तिथे मनाला हेलावून सोडेल, असे दृष्य समोर आलं आहे. ही वेळ का आली असावी, असं कोडं त्या सगळ्यांना पडलं आहे. हेही वाचा.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाढी-कटींग कुठे करतात? भाजप नेत्याचा खोचक सवाल घर गेलं, घरातील सामानही गेलं ,आयुष्य उगड्यावर आलं, निसर्गाने उदवस्त झालेल्या बेघर कुटुंबांना बस स्थानकात राहण्याची वेळ आली आहे. पाच दिवसानंतरही त्यांची दखल प्रशासननी घेतलेली नाही. संपादन- संदीप पारोळेकर