• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मनोहर भोसलेचा खेळ खल्लास, महागड्या गाडीतून फिरत असताना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मनोहर भोसलेचा खेळ खल्लास, महागड्या गाडीतून फिरत असताना पोलिसांनी घेतलं ताब्यात

 आरोपी मनोहर मामा हा फरार झालेला होता.  त्याच्या शोधासाठी तीन पथकं रवाना झाली होती.

आरोपी मनोहर मामा हा फरार झालेला होता. त्याच्या शोधासाठी तीन पथकं रवाना झाली होती.

आरोपी मनोहर मामा हा फरार झालेला होता. त्याच्या शोधासाठी तीन पथकं रवाना झाली होती.

  • Share this:
सोलापूर, 10 सप्टेंबर : बाळूमामांचा (Saint Balu Mama) अवतार सांगणाऱ्या मनोहर मामा ऊर्फ मनोहर भोसलेविरोधात (Manohar Mama Bhosale) एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल झाल्यामुळे पाय चांगलाच खोलात गेला होता. त्यामुळे दोन दिवसांपासून मनोहर मामा फरार झाला होता. पण, अखेर सोलापूर आणि बारामती पोलिसांनी (baramti police ) त्याला साताऱ्यातून ताब्यात घेतलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित आणि श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले याचा खेळ आता संपला आहे. मनोहर मामाला सोलापूर एलसीबी आणि बारामती पोलिसांनी साताऱ्यातून ताब्यात घेतलं आहे. मनोहर मामाला अत्यंत महागड्या गाड्यातून फिरत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला पोलीस स्टेशनला आणण्याची प्रक्रिया सुरू असून त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहे. Weather Alert: पुढील 5 दिवस पुण्याला झोडपणार पाऊस; हवामान खात्याकडून हाय अलर्ट आजच सोलापूरमध्ये एका महिला भक्ताच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार करत तिच्याकडून खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कथित महाराज मनोहर भोसले याच्यासह त्याचे साथीदार नाथ बाबा उर्फ विशाल वाघमारे आणि वैभव वाघ या तिघांवर भादवि कलम 376, 385,506 तसेच जादुटोणा विरोधी प्रतिबंधक कायदा 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केल्यानंतर तो करमाळा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, 6 जणांचा मृत्यू तर 16 जनावरांसह 900 कोंबड्या दगावल्या पीडित महिला ही आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर मामाच्या आश्रमात आली होती. त्यानंतर तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिघांनी तिची फसवणूक करत तिच्यावर बलात्कार केला होता. दरम्यान आरोपी मनोहर मामा हा फरार झालेला होता.  त्याच्या शोधासाठी तीन पथकं रवाना झाली होती. अखेर मनोहर मामाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
Published by:sachin Salve
First published: