पुणे, 10 सप्टेंबर: सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात सर्वदूर पावसानं हजेरी जोरदार (Rainfall in Maharashtra) हजेरी लावली आहे. त्यानंतर आता राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पण मराठवाड्यात ढगफुटी सदृश्य कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाला आलेला घास हिरावला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्यानं सर्व पिकं जळून गेली आहे. यानंतर आता राज्यात पुन्हा पावसानं विश्रांती घेतली आहे. पण आज कोकण आणि घाट परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.
आज पुणे सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंदुधुर्ग या सहा जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट (yellow alert) जारी केला आहे. येत्या चोवीस तासांत याठिकाणी वेगवान वाऱ्याच्या साथीनं मुसळधार पावसाची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यात 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजांचा कडकडाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी मोठ्या झाडाखाली उभं राहू नये, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा-Corona Vaccine : कोवॅक्सिनचा दुसरा डोस मिळत नाही, काळजी करू नका कारण...
उद्याही राज्यात कमी अधिक फरकानं अशीच स्थिती कायम राहणार आहे. पण उद्या रत्नागिरी जिल्ह्याला मात्र ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पण विकेंडनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 12 सप्टेंबरनंतर अनेक जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज आणि येलो अलर्ट दिले आहेत. 13 आणि 14 सप्टेंबर रोजी राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. पण तुलनेनं कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
हेही वाचा-कोरोना लसीकरणामुळे मृत्यूचा धोका कमी?, केंद्र सरकारनं दिली माहिती
पुण्यात 5 दिवस पावसाचे
गेल्या आठवड्यापासून पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. पुढील पाचही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील तीन दिवस पुण्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 13 आणि 14 सप्टेंबर रोजी पुण्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दोन दिवसांत जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Pune, Weather forecast