मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, 6 जणांचा मृत्यू तर 16 जनावरांसह 900 कोंबड्या दगावल्या

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, 6 जणांचा मृत्यू तर 16 जनावरांसह 900 कोंबड्या दगावल्या

राज्याच्या विविध भागांत गेल्या आठवड्याभरात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी आता समोर येऊ लागली आहे.

राज्याच्या विविध भागांत गेल्या आठवड्याभरात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी आता समोर येऊ लागली आहे.

राज्याच्या विविध भागांत गेल्या आठवड्याभरात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी आता समोर येऊ लागली आहे.

बीड, 10 सप्टेंबर : बीड जिल्ह्यात (Beed District) मागील चार दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rainfall) मोठी जीवितहानी झाली आहे. बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये सहा जणांचा बुडून, वाहून गेल्याने मृत्यू झाला. तसेच 16 जनावरांसह 900 कोंबड्या दगावल्या आहेत. मागील चार दिवसांत तब्बल 74 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

तलाव फुटण्याच्या भीतीने अख्ख गाव रात्रभर जागलं, SDRF घटनास्थळी

गेवराई तालुक्यात पाच साठवण तलाव फुटले आहेत. धारूरमधील आरणवाडी तलावाचा सांडवा दुसऱ्यांदा फोडावा लागला. नद्या, नाल्यांसह ओढे खळखळून वाहून गेले. अनेक गावांत पाणी शिरले. हजारो हेक्टर जमीन आणि पिके पाण्याखाली गेल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने पाऊस कमी झाल्यानंतर पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.

अकोल्यातही अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान

अकोला जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 195 गावांमध्ये 8 हजार 657 हेक्टर क्षेत्रावर पिके बाधीत झाले आहेत. बाधीत झालेल्या पिकांत प्रामुख्याने सोयबीन, कापूस, मुग, उडीद, तूर या पिकांचा समावेश आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. अद्याप पंचनामे करण्याचे काम सुरु आहे, असेही जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

यासंदर्भात जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, अकोला तालुक्यात 21 गावांमध्ये 1 हजार 347 हेक्टर क्षेत्रावर, मुर्तिजापूर तालुक्यात 33 गावांमध्ये 443 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना, अकोट तालुक्यात 102 गावांमध्ये 2 हजार 647 हेक्टर क्षेत्रावर, तेल्हारा तालुक्यात 24 गावांमध्ये 3 हजार 400 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे असे एकूण 195 गावांमध्ये 8 हजार 657 हेक्टर क्षेत्रावर पिके बाधीत झाले आहेत. अद्याप पातूर व बार्शीटाकळी या तालुक्यात पिके बाधीत झाल्याची माहिती नाही.

First published:
top videos

    Tags: Beed, Rain