Home /News /maharashtra /

अखेर 14 वर्षांनंतर भिडे गुरुजी हाजीर झाले, सांगली कोर्टाने दिला दिलासा

अखेर 14 वर्षांनंतर भिडे गुरुजी हाजीर झाले, सांगली कोर्टाने दिला दिलासा

 जोधा-अकबर चित्रपटावरून (jodha akbar movie) सांगलीत 2008 साली झालेल्या दंगल प्रकरणी संभाजी भिडे गुरुजींसह 90 जणांवर गुन्हे दाखल आहे

जोधा-अकबर चित्रपटावरून (jodha akbar movie) सांगलीत 2008 साली झालेल्या दंगल प्रकरणी संभाजी भिडे गुरुजींसह 90 जणांवर गुन्हे दाखल आहे

जोधा-अकबर चित्रपटावरून (jodha akbar movie) सांगलीत 2008 साली झालेल्या दंगल प्रकरणी संभाजी भिडे गुरुजींसह 90 जणांवर गुन्हे दाखल आहे

सांगली, 26 जानेवारी : जोधा-अकबर चित्रपटावरून (jodha akbar movie) सांगलीत 2008 साली झालेल्या दंगल प्रकरणी  शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी (sambhaji bhide) तब्बल 14 वर्षांनंतर सांगलीतील न्यायालयात हजर झाले. संभाजी भिडे यांच्यासह माजी आमदार नितीन शिंदे यांच्या सहित संशयित 90 जण सुद्धा हजर झाले.  गुन्हा दाखल झाल्यानंतर आज पहिल्यांदा संभाजी भिडे सांगली न्यायालयात हजर झाले असून कोर्टाने तुर्तास भिडे गुरुजींना दिलासा देत अटकपूर्व जामीन अर्ज रद्द केला आहे. 2008 मध्ये अभिनेता ह्रतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या जोधा अकबर सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाला हिंदुत्वावादी संघटनांनी कडाडून विरोध केला होता. चित्रपट प्रदर्शना विरोध आणि त्यांनतर पोलिसांनी आंदोलकांना अटकाव केल्यानंतर सांगलीत तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. (तरुणीचं अपहरण करत सामूहिक बलात्कार, नंतर दिल्लीच्या गल्ल्यांमध्ये पीडितेची धिंड) त्यावेळी सांगलीत संचारबंदी पण लागू केली होती. एस टी बसेस आणि सार्वजनिक मालमत्तेच नुकसान सुद्धा झालं होतं. तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णा प्रकाश यांच्या कारकीर्दमध्ये ही दंगल घडली होती. या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी आणि माजी आमदार नितीन शिंदे यांच्या सहित संशयित 90 जणांवर गुन्हे दाखल झाले होते. (श्रेयस अय्यरची जागा घेण्यासाठी दोन खेळाडू तयार, काही क्षणात पलटवतात मॅच!) या प्रकरणी संभाजी भिडे सहित 4 जणांना जमीन मंजूर करण्यात आला आहे. तर माजी आमदार नितीन शिंदे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील आणि सुनीता मोरे याना 15 हजार रुपयांचा दंड करून जमीन देण्यात आला आहे. एकूण 90 ते 95 आरोपी होते, त्यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाले होते. प्रत्येक वेळी आरोप हे वेगवेगळी कारण देऊन गैरहजर राहत होती. तर भिडे गुरुजी यांच्याविरोधातील अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करण्यात आला आहे. इतर आरोपींना दंड भरण्यास सांगितला आहे. पुढच्या तारखेला हजर राहण्यास कोर्टाने तंबी दिली आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या