मुंबई, 27 जानेवारी : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातल्या 3 वनडे मॅचच्या सीरिजची सुरूवात 6 जानेवारीपासून होणार आहे. वनडे सीरिजनंतर 3 मॅचची टी-20 सीरिजही होणार आहे. या दोन्ही सीरिजसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या वनडे सीरिजमध्ये अपयशी ठरल्यानंतरही श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) वनडे आणि टी-20 सीरिजसाठी टीममध्ये जागा देण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये अय्यर अपयशी ठरला तर त्याचं टीममधलं स्थान धोक्यात येऊ शकतं, कारण त्याची जागा घेण्यासाठी दोन खेळाडू आधीच तयार आहेत. ऋषी धवन हिमाचल प्रदेशला पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) विजय मिळवता आला, याचं कारण होतं त्यांचा कर्णधार ऋषी धवन (Rishi Dhawan). 2020-21 च्या मोसमात धवनने 8 सामन्यांमध्ये 458 रन केले आणि 17 विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीमची निवड करताना ऋषी धवनच्या नावाचीही चर्चा झाली होती, पण तेव्हाही आणि आता वेस्ट इंडिजविरुद्धही त्याला संधी मिळाली नाही. यानंतर मात्र ऋषी धवनची टीम इंडियात निवड होऊ शकते. ऋषी धवनने 2016 सालीच टीम इंडियाकडून पदार्पण केलं होतं, पण 3 वनडे मॅच खेळल्यानंतर त्याला संधी मिळाली नाही. शाहरुख खान आयपीएलमध्ये (IPL) पंजाब किंग्सकडून (Punjab Kings) खेळलेल्या शाहरुख खाननेही (Shahrukh Khan) धमाका केला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये शाहरुख खानने तामिळनाडूकडून खेळताना 39 बॉलमध्ये 79 रन केले, यात 7 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. याशिवाय सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये अखेरच्या बॉलवर सिक्स मारून त्याने तामिळनाडूला जिंकवून दिलं होतं. शाहरुखला टीम इंडियात स्थान मिळालं, तर तो फिनिशरची भूमिका पार पाडू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.