Home /News /crime /

Delhi Rape : आधी सामूहिक बलात्कार, नंतर पीडितेची रस्त्यावर धिंड काढली, दिल्लीत काय चाललंय?

Delhi Rape : आधी सामूहिक बलात्कार, नंतर पीडितेची रस्त्यावर धिंड काढली, दिल्लीत काय चाललंय?

दिल्लीत प्रचंड भयानक घटना समोर आली आहे. तीन नराधमांनी एका 20 वर्षीय विवाहितेचं अपहरण करत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर गल्ल्यांमध्ये तिचे डोक्यावरील केस कापत, चेहऱ्यावर काळीमा फासत धींड काढली.

    नवी दिल्ली, 27 जानेवारी : दिल्लीतून (Delhi) एक भयानक घटना समोर आली आहे. तीन नराधमांनी एका 20 वर्षीय मुलीचं अपहरण (Kidnapped) करुन तिच्यावर अमानुषपणे सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला. त्यानंतर आरोपींनी आणखी अमानवीय कृत्य केलं. आरोपींनी पीडितेचे केस कापले. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर काळीमा फासत तिची धींड काढली. यावेळी तिच्या गळ्यात चप्पलांचा हार घातला. विशेष म्हणजे बलात्कार करणाऱ्यांचं समर्थन करणाऱ्या महिलांनी मिळून पीडितेची धिंड काढली. त्यामुळे महिला एका मुलीसोबत इतकं खालच्या थराचं कसं वागू शकतात? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. संबंधित घटनेबाबत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. "मी पीडित मुलीला भेटली. तिने सांगितलं की, तीन नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. तिथे उभ्या असलेल्या महिलांनी त्या आरोपींना सामूहिक बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त केलं. मुलीच्या शरीरावर अमानवीय जखमा आहेत. आरोपींनी एवढं केल्यावरही पीडितेला सोडलं नाही. त्यांनी मुलीच्या डोक्यावरचे केस कापली. तसेच चेहऱ्याला काळीमा फासली. संबंधित आरोपी हे अवैधरित्या दारु विकतात. त्यांची दादागिरी वाढली आहे. पोलिसांनी या आरोपींच्या मुसक्या आवळायला हव्यात. या प्रकरणी मी दिल्ली पोलिसांना नोटीस जारी करत आहे. सर्व नराधम आणि महिला आरोपींना अटक व्हावी. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्यात यावी", असं स्वाती मालीवाल म्हणाल्या आहेत. आरोपी महिला जेव्हा पीडित तरुणीच्या चेहऱ्यावर काळीमा फासून गल्लीतर फिरवत होत्या तेव्हा पीडितेच्या लहान बहिणीन पोलिसांना फोन करुन याबाबतची माहिती दिली. संबंधित माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पीडित तरुणीला आरोपी महिलांच्या ताब्यातून सोडवलं. सध्या या तरुणीचं समुपदेशन सुरु आहे. (चित्रपटाला सुद्धा लाजवेल, या दोन भामट्यांनी तब्बल 250 तरुणींना फसवलं, आणि...) दरम्यान, पीडित तरुणीच्या सांगण्यावरुन सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीसोबत छेडछाड केल्याप्रकरणी चार महिलांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलीस काही आरोपींच्या शोधात आहेत. आरोपींनी जुन्या भांडणाच्या रागातून संबंधित कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे. पीडित तरुणी ही विवाहित आहे. तसेच तिला एक लहान मुलगा देखील आहे. पोलीस या प्रकरणाचा चारही बाजूंनी तपास करत आहेत. पीडितेच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या शेजारी राहणारा एक तरुण तिच्या मागे लागला होता. त्या मुलाने 12 नोव्हेंबरला आत्महत्या केली होती. या घटनेमुळे मृतक मुलाच्या कुटुंबियांनी पीडित मुलीमुळेच त्याने आत्महत्या केली, असा दावा केला होता. पोलीस या दृष्टीकोनानेही तपास करत आहेत. कारण पीडित मुलीच्या काकांनी याबाबत गंभीर आरोप केले आहेत. आरोपींनी रात्री बारा वाजेच्या सुमारास चाकू दाखवत तिचं अपहरण केलं, असा दावा त्यांनी केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास सध्या करत आहेत.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Crime news, Delhi, Gang Rape

    पुढील बातम्या