मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गुंगीचं औषध देत सुरू झाला भयंकर खेळ; नराधम 2 वर्षांपासून तरुणीला देत होता नरक यातना

गुंगीचं औषध देत सुरू झाला भयंकर खेळ; नराधम 2 वर्षांपासून तरुणीला देत होता नरक यातना

Rape in Sangli: सांगलीत एका तरुणीवर तब्बल दोन वर्षे अत्याचार (Young woman raped for 2 years) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Rape in Sangli: सांगलीत एका तरुणीवर तब्बल दोन वर्षे अत्याचार (Young woman raped for 2 years) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Rape in Sangli: सांगलीत एका तरुणीवर तब्बल दोन वर्षे अत्याचार (Young woman raped for 2 years) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    सांगली, 31 ऑक्टोबर: सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यात एका तरुणीवर तब्बल दोन वर्षे अत्याचार (Young woman raped for 2 years) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नेहमी घरी ये-जा असणाऱ्या व्यक्तीनेच गुंगीचं औषध देत तिच्यावर अत्याचाराचा कळस (give soporific drugs and raped) गाठला आहे. आरोपीनं पीडित तरुणीला बिर्याणीतून गुंगीचं औषध देत, तिच्यावर बलात्कार केला होता. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित तरुणीचे अश्लील फोटोज आणि व्हिडीओज देखील शूट (shoot obscene videos) केले आहेत. संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं अनेकदा तिच्यावर अत्याचार केला आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने संबंधित प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला आहे. पीडित मुलीच्या आई वडिलांनी आरोपीला घरी बोलावून जाब विचारला असता, आरोपीने संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि पीडित मुलीचं लग्न होऊ न देण्याची धमकी दिली आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हेही वाचा-शेजारच्या इमारतीतील लेकही मदतीला नाही येऊ शकला; एकट्या राहणाऱ्या आईचा भयावह अंत पोलिसांनी बलात्कार, फसवणूक, धमकी आणि ब्लॅकमेल अशी विविधा कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अतुल बाजीराव पाटील असं अटक केलेल्या 42 वर्षीय आरोपीचं नाव असून तो वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल पाटील याचं पीडीत तरुणीच्या घरी येणं-जाणं होतं. हेही वाचा-नगरमध्ये विवाहितेवर दोनदा गँगरेप; नराधमांनी हात-पाय बांधून दिल्या नरक यातना दोन वर्षांपूर्वी पीडित तरुणी घरी एकटी असताना आरोपी अतुल तिच्या घरी आला होता. यावेळी आरोपीनं पीडितेला गुंगीचं औषध मिसळलेली बिर्याणी खायला दिली होती. ही बिर्याणी खाल्ल्यानंतर पीडितेला गुंगी आली आहे. शुद्ध हरपलेल्या पीडितेवर आरोपीनं बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने पीडित तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ शूट केले. संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं तरुणीच्या घरी आणि विविध लॉजवर घेऊन जात तिच्यावर वारंवर बलात्कार केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा संतापजनक प्रकार सुरू होता. आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास इस्लामपूर पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Rape, Sangli

    पुढील बातम्या