संतापजनक! नगरमध्ये विवाहितेवर दोनदा सामूहिक बलात्कार; नराधमांनी हात-पाय बांधून दिल्या नरक यातना

संतापजनक! नगरमध्ये विवाहितेवर दोनदा सामूहिक बलात्कार; नराधमांनी हात-पाय बांधून दिल्या नरक यातना

Gang Rape In Ahmednagar: अहमदनगरमधील एका विवाहित महिलेवर चार जणांनी दोन वेळा सामूहिक अत्याचार (Twice gang raped by 4 men) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेनं गुन्हा दाखल केला आहे.

  • Share this:

अहमदनगर, 31 ऑक्टोबर: अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या नेवासा (Nevasa) तालुक्यातील रामडोह येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका विवाहित महिलेवर (Married woman gang rape) चार जणांनी दोन वेळा सामूहिक अत्याचार (Twice gang raped by 4 men) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी पीडित विवाहितेला जीवे मारण्याची धमकी (Threat to death) देत त्याच्यावर अत्याचारासाचा कळस गाठला आहे. आरोपींनी दुसऱ्यांदा अत्याचार केल्यानंतर पीडितेनं नेवासा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दाखल (FIR lodged) केली आहे.

पोलिसांनी सामूहिक बलात्कारासह धमकी आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्ह दाखल केला आहे. संतोष अप्पासाहेब गढेकर, शिवाजी पंढरीनाथ घुले, ऋषिकेष काकासाहेब गोरे आणि संदीप गोरख आगळे अशी गुन्हा दाखल झालेल्या चार आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून घटनेचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा-आधी कट मारला मग फरफटत नेत ST चालकाला चिरडलं; नाशकात कंटेनर चालकाचं निर्दयी कृत्य

फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीनुसार, तीन महिन्यापूर्वी पीडित विवाहित महिलेचे पती, मुली आणि सासरे कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान पीडित महिला घरी एकट्याच होत्या. विवाहितेला घरी एकटं पाहून संबंधित चार आरोपी जबरदस्ती करत तिच्या घरात शिरले. आरोपींनी पीडितेच्या तोंडात रुमाल कोंबून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. तसेच आरोपींनी घटनेची वाच्यता केल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडितेनं आरोपींचा अत्याचार निमूटपणे सहन केला. दरम्यान पीडित महिला आपल्या माहेरी गेली असता, आरोपींनी तिला फोन करून धमकी दिली होती. त्यामुळे संबंधित प्रकार पीडित महिलेच्या घरी देखील समजला होता.

हेही वाचा-आधी सुसाइड नोट लिहून घेतली मग दिला भंयकर मृत्यू; महिलेच्या हत्येनं मुंबई हादरली!

यानंतर, आठ दिवसांपूर्वी पीडित महिला शेतात एकटी झोपली असताना आरोपींनी पीडितेचे हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार केला आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित विवाहितेनं नराधम आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित चारही आरोपीविरोधात सामूहिक बलात्कार, जीवे मारण्याची धमकी, ब्लॅकमेल अशा विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अद्याप कोणत्याही आरोपीला अटक केली नसून घटनेचा तपास केला जात आहे.

Published by: News18 Desk
First published: October 31, 2021, 2:34 PM IST

ताज्या बातम्या