गडचिरोली17 मे : गडचिरोलीमध्ये वन्य प्राण्यांमुळे दोनजण जखमी झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. यातील पहिल्या घटनेत एका बिबट्याने चालत्या गाडीवर हल्ला केला आहे. ही घटना शंकरपूर लगतच्या जंगलात घडली आहे. यात कुरखेडा येथे पेपर टाकल्यानंतर पेपर टॅक्सी नागपुरला परत जात होती. यावेळी जंगलात जाताच बिबट्याने गाडीवर हल्ला (Leopard Attack) केला. यात वाहनचालक जखमी झाला आहे. मात्र, सुदैवाने बिबट्याच्या हल्ल्यानंतरही वाहनचालकाने गाडीवरील नियंत्रण सुटू न दिल्याने अपघात टळला आणि त्याचा जीव वाचला. नाशिकमध्ये मोकाट कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला, मुलगा गंभीर जखमी, VIDEO समोर तर जिल्ह्यातील दुसऱ्या घटनेत एका हरणाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाली आहे (Deer Hit a Biker). यात दुचाकीस्वार आपल्या गाडीने रस्त्यावरुन जात होता. इतक्यात हरणाचा कळप रस्ता ओलांडू लागला. शेवटी राहिलेल्या एका हरणाने अचानक रस्त्यावर उडी घेतल्याने हरण थेट दुचाकीला जाऊन धडकलं. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
हरणाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी, गडचिरोलीतील घटना pic.twitter.com/02blxRlQ86
— News18Lokmat (@News18lokmat) May 17, 2022
व्हिडिओमध्ये दिसतं की दुचाकीस्वार रस्त्याने चाललेला आहे. मागेही एक गाडी असून त्यावर बसलेल्या व्यक्तीने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे. दुचाकीस्वार रस्त्यावरुन जाताना अचानक एक हरण रस्ता ओलांडण्यासाठी उडी घेतं. मात्र, अचानक हरण गाडीला धडकल्याने दुचाकीस्वाराचं गाडीवरील नियंत्रण सुटतो आणि तो खाली कोसळतो. मागून येत मेंढीनं इतक्या जोरात धडक दिली की थेट पाण्यात कोसळला व्यक्ती, Shocking Video आजूबाजूने इतर वाहनेही जाताना दिसत आहेत. मात्र, या धडकेनंतर बराच वेळ दुचाकीस्वाराला आपल्या जागेवरुन उठता येत नाही. यावरुन अपघातात त्याला बराच मार लागला असल्याचा अंदाज येतो. हा अपघात शहरातील नेमका कोणत्या ठिकाणी घडला, हे अद्याप समोर आलेलं नाही.