Home /News /maharashtra /

धक्कादायक: सात नराधमांकडून मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार, पीडिता गरोदर

धक्कादायक: सात नराधमांकडून मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार, पीडिता गरोदर

पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे.

रायगड, 3 एप्रिल: संपूर्ण देशासह राज्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं असताना अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील एका मतिमंद मुलीवर सातजणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी सातही नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. हेही वाचा.. कोरोनाच्या संशयानं केला प्रेमाचा शेवट; वॉर्ड बॉयकडून डॉक्टर प्रेयसीची हत्या काय आहे प्रकरण? रेवदंडा येथील एक मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत राहते. ही मुलगी मतिमंद आहे. याचा गैरफायदा घेऊन परिसरातील सात जणांची तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. एवढेच नाही तर नराधम गेल्या काही महिन्यांपासून हे घृणास्पद कृत्य करत होते. पीडितेला त्रास होवू लागल्यामुळे तिच्या आईने तिला डॉक्टरकडे नेले. मुलगी गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. ही माहिती डॉक्टरांनी मुलीच्या आईला सांगताच तिने रेवदंडा पोलिस स्टेशन गाठलं. पोलिस तपासात सातजणांची नावे समोर आली. सर्व आरोपींविरोधात रेवदंडा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सातही जणाना अटक केली आहे. पुढील तपास डीवायएसपी सोनाली कदम, पीआय जैतापुरकर करत आहेत. हेही वाचा.. पोलिसांची मोठी कारवाई, एकत्र नमाज पठणासाठी गेलेले 70हून अधिकजण ताब्यात दरम्यान, दिल्लीतील निर्भया प्रकरणातील चारही आरोपींनी 20 मार्च रोजी तिहार तुरुंगात फासावर लटकावण्यात आलं. तरी देखील महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर वचक बसलेला नाही. समाजात अजूनही महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा बसलेला नाही.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Maharashtra police

पुढील बातम्या