मालेगाव, 30 एप्रिल: कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगावात हाहाकार उडाला आहे. सरासरी एका तासाला 4 असे गेल्या 24 तासांत 82 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. 3 महिन्यांची बालिका, 2 वर्षांचा मुलगा आणि 13 पोलिसांचा कोरोनाबाधित रुग्णांमध्ये समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 252 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कठोर निर्देश दिले आहेत.
हेही वाचा... कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा धोका वाढला, 20 दिवसांच्या बाळाला झाली लागण
मालेगावात अत्यंत बिकट परिस्थिती आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांनी आपली प्रॅक्टिस सुरू करावी. प्रशासन मदत करणार करावी. कारवाई करण्याची वेळ आणू नका, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. सर्व सरकारी हॉस्पिटलमध्येही नॉन कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
मालेगावात जास्त संसर्ग झालेला नाही. काही परिवारांमध्येच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. क्वारंटाईन केलेल्या रुग्णांचेच रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. जास्त बारकाईने लक्ष दिलं तर 100 टक्के परिस्थिती आटोक्यात येईल. नाशिकमध्येही मुंबईच्या धर्तीवर टास्कफोर्स तयार करण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
हेही वाचा.. लॉकडाउनमध्ये राज्यातून बाहेर जायचंय? हे आहेत नियम
दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. नाशिकमध्ये कोरोनाचं थैमान सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ मालेगाव शहर हॉटस्पॉट ठरलं आहे. बुधवारी रात्री आलेल्या अहवालानुसार मालेगाव शहरात 82 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. मालेगावात सरासरी एका तासाला 4 कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये 3 महिन्यांच्या नवजात शिशुचा सामावेश आहे. अत्यावश्यक सेवा आणि आपली जीव धोक्यात घालून अहोरात्र ड्युटी करणाऱ्या 12 पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
संपादन- संदीप पारोळेकर