जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / लॉकडाउनमध्ये राज्यातून बाहेर जायचंय? हे आहेत नियम

लॉकडाउनमध्ये राज्यातून बाहेर जायचंय? हे आहेत नियम

लॉकडाउनमध्ये राज्यातून बाहेर जायचंय? हे आहेत नियम

परराज्यातील लोकांच्या ये-जासाठी दोन्ही राज्ये एकमेकांशी बोलून त्यांची रस्तेमार्गे कशी वाहतूक करायची ते ठरवतील.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मजूर, कामगार, विद्यार्थी आणि प्रवासी अडकून पडले आहे. अखेर अशा लोकांना आपल्या राज्यात परत जाण्यासाठी राज्य सरकारने अटी शर्थींसह परवानगी दिली आहे. त्यासाठी काही अटी आणि नियम तयार करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील तसेच मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाईल. याबाबतीत अतिशय काळजीपूर्व व जबाबदारीने सर्व यंत्रणांनी अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. **हेही वाचा -** वडिलांचं आजारपण सांगून लॉकडाऊनमध्ये पडला बाहेर, रुग्णवाहिकेतून घेऊन आला वरात जिल्ह्यांचे नोडल अधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील अडकलेल्या व्यक्तींची यादी तयार करून संबंधित इतर जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवतील. परराज्यातील लोकांच्या ये-जासाठी दोन्ही राज्ये एकमेकांशी बोलून त्यांची रस्तेमार्गे कशी वाहतूक करायची ते ठरवतील. जिल्हाधिकारी किंवा संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन यांचे पत्र असल्याशिवाय लोकांच्या कोणत्याही गटाला स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या व्यक्तीना कोविड किंवा इंफ्लूएन्झा सारखी लक्षणे नाहीत त्यानांच केवळ प्रवासाची परवानगी दिली जाईल. लक्षणे असल्यास निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे वैद्यकीय उपचार करण्यात येतील. इतर राज्यांतील किंवा जिल्ह्यांमधील प्रशासनाच्या पत्रात संबंधित व्यक्तीस कुठलेही लक्षण नाही हे स्पष्टपणे लिहिलेले असणे आवश्यक करण्यात आले आहे. इथं संपर्क करू शकता मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, महिला बाल विकास प्रधान सचिव आय.ए कुंदन, तसेच संचालक , आपत्ती व्यवस्थापन अभय यावलकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 022 -22027990, 022 -22023039 हे दूरध्वनी क्रमांक असून controlroom@maharashtra.gov.in हा ईमेल देण्यात आला आहे. हेही वाचा - लॉकडाऊनमुळे मोक्षही लांबणीवर, लॉकरमध्ये ठेवल्या तब्बल 200 अस्थी राज्य सरकारचे महत्त्वाचे नियम - जिल्हाधिकारी किंवा संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन यांचे पत्र असल्यावर प्रवासासाठी मुभा - कोविड किंवा इंफ्लूएन्झा सारखी लक्षणे नाहीत त्यानांच केवळ प्रवासाची परवानगी - पत्रात संबंधित व्यक्तीस कुठलेही लक्षण नाही हे स्पष्टपणे लिहिलेले असणे आवश्यक - ज्या राज्यात ती व्यक्ती जात आहे तेथील राज्याने ठरवलेल्या नियमांप्रमाणे वागणे व उपचार घेणे बंधनकारक - ज्यांना स्वत:च्या वाहनाने जायचे आहे त्यांच्याकडे देखील अशाच पद्धतीने राज्यांची संमती पत्रे असणे आवश्यक - प्रवाशाना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडे राज्याचा ट्रान्झीट पास असणे व त्यावर सर्व प्रवाशांची नावे व इतर माहिती असणे गरजेचं असून यामध्ये वाहनाचा निश्चित मार्ग, कालावधी असणेही बंधनकारक - पाठपुराव्यासाठी ज्या स्थळी जे प्रवासी उतरणार आहेत तशी यादी त्या त्या राज्य किंवा जिल्ह्यांना देण्यात येणार - वाहतुकीला वापरण्यात येणारी वाहने जंतुनाशकांनी फवारलेली असावी - वाहनात देखील सोशल डिस्टेंसिंग पाळावे लागणार - महाराष्ट्रात इतर राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाइन कालावधीत राहावे लागेल - सर्व प्रवाशांची प्रथम वैद्यकीय तपासणी होणार त्यानंतर सबंधित व्यक्तीस घरीच क्वारंटाइन किंवा संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात येईल - केंद्र शासनाचे आरोग्यसेतू मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येईल जेणे करून त्यांना कायम संपर्कात ठेवता येईल संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात