कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा धोका वाढला, 20 दिवसांच्या बाळाला झाली लागण

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा धोका वाढला, 20 दिवसांच्या बाळाला झाली लागण

मुंबई, पुण्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.

  • Share this:

कल्याण, 30 एप्रिल: मुंबई, पुण्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. महापालिकेच्या परिसरात कोरोनाबाधित 6 नवे रुग्ण आढळले आहेत. यात 20 दिवसांच्या चिमुरड्याचा समावेश आहे. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 162 वर पोहोचला आहे. दरम्यान, काल कोरोनाने चौथा बळी घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे.

महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी की, महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्‍या कोरोनाबाधित रुग्‍णांमध्ये मुंबई येथील शासकीय आरोग्य कर्मचाऱ्याची समावेश आहे. तसेच खासगी रुग्णालयातील कर्मचारी, वाशी येथील पीएमसी मार्केट‍मधील दोन कामगारांचाही समावेश आहे. महापालिका क्षेत्रातील एकूण 162 रुग्णांपैकी 47 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा.. वडिलांचं आजारपण सांगून लॉकडाऊनमध्ये पडला बाहेर, रुग्णवाहिकेतून घेऊन आला वरात

एकूण 162 रुग्णांची विगतवारी -

कल्याण पूर्व - 30

कल्याण पश्चिम - 21

डोंबिवली पूर्व - 57

डोंबिवली पश्चिम - 4

मांडा टिटवाळा - 6

मोहने - 6

नांदिवली - 1

दरम्यान, कल्याण डोंबिवली पालिकेच्या हद्दीतील गोळवली गावात एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महिलेचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या महिलेच्या घरातील सर्व सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तसेच, या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

हेही वाचा.. परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्य सरकारने अखेर उचलले पाऊल

मुंबईत काम करणारा हॉटेलचा कर्मचारी, भाजी मंडईतील सुरक्षा रक्षक, दादर इथं खाजगी कंपनीचा अभियंता आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. यात एका 12 वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 30, 2020, 3:55 PM IST

ताज्या बातम्या