Home /News /maharashtra /

मालेगावात धोका वाढला, कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू, मृतांचा आकडा 8 वर

मालेगावात धोका वाढला, कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू, मृतांचा आकडा 8 वर

कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावात धोका दिवसंदिवस वाढत आहे. मालेगाव शहरात सोमवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे.

मालेगाव, 20 एप्रिल: कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावात धोका दिवसंदिवस वाढत आहे. मालेगाव शहरात सोमवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या मध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह होता तर दुसरा संशयित असून त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. रिपोर्ट येण्याआधीच या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 64 वर्षीय महिला तर 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. एका रुग्णावर सामान्य रुग्णालयात तर दुसऱ्यावर जीवन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मालेगावात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची संख्या आता 8 झाली आहे, अशी माहिती मनपा उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे. हेही वाचा..आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांचे चुकीचे स्वॅब सॅम्पल घेणं भोवलं दरम्यान, मुंबई-पुणे पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर हे कोरोना हॉटस्पॉट बनला आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मालेगावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 79 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनाने 8 जणांचा बळी घेतला आहे. शहरातील एकूण 14 परिसर कँटोमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे सर्व भाग सील करण्यात आले आहेत. कोणीही गांभीर्याने घेण्यास तयार नाही! नागरिकांमध्ये भीती आहे. मात्र, कोणीही गांभीर्याने घेण्यात तयार नाही. दररोज मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहेत. आता तर प्रशासनही हतबल झाले आहे. त्यात आजी-माजी लोकप्रतिनिधींनी जनतेला वाऱ्यावर सोडत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले आहे. वेळीच कठोर पावलं उचलली नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेही वाचा..चोरीच्या संशयाखाली पकडलेला तरुण निघाला कोरोना पॉझिटिव्ह, पोलीस ठाण्यात खळबळ नागरिकांमध्ये कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. तरी देखील कोरोना या प्राणघातक रोगाला कोणीही गांभीर्याने घेण्यास तयार नाही. दररोज मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडून बाजारात गर्दी करत आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन कमी पडत आहे. तर दुसरीकडे ज्यांच्यावर नागरिकांमध्ये कोरोना हा किती घातक आहे, याची जाणीव करून देण्याची जबाबदारी आहे असे आजीमाजी लोकप्रतिनिधीनी जनतेला वाऱ्यावर सोडत किरकोळ कारणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे आता जर सर्वांनी मिळून कठोर पाऊल उचललं नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. लॉकडाऊनचं उल्लंघन... मालेगाव शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होणास स्थानिक नागरिक कारणीभूत ठरत आहेत. शहरात लॉकडाऊनचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची धावपळ होत असून एकूण 400 जणांची पथके तैनात करण्यात आली आहेत. मालेगावात प्रत्येकाची चाचणी घेण्याचे ठरवण्यात आलं आहे. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Coronavirus, Malegaon, Nashik

पुढील बातम्या